TRENDING:

Pune News: लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले अन्... पुण्यातील घटनेला धक्कादायक वळण; नेमकं काय घडलं?

Last Updated:

महिलेशी वाद घातल्यानंतर 50 ते 55 फूट खोल असलेल्या खाणीत त्यांना ढकलून दिल्याचा आरोप आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे :   पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 40  वर्षीय महिलेचा 6 जणांनी मिळून खून केलाय आहे.  10 फेब्रुवारी मांगडेवाडी येथील दगडाच्या खाणीत महिलेला ढकलून हत्या करण्यात आली होती. संशयित अवस्थेत आढळून आलेल्या या महिलेच्या मृत्यूचे गूढ उलगडले असून महिलेवर आधी बलात्कार करून तिला दगडाच्या खाणीत ढकलून खून करण्यात आला असल्याची शक्यता वर्तवली जात आ आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.
News18
News18
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमहिला वेश्याव्यवसाय करायची. 8  फेब्रुवारीच्या रात्री साडेनऊच्या सुमारास ती कोंढवा परिसरातील कान्हा चौकात मद्यधुंद अवस्थेत उभी होत्या. त्यावेळी आरोपी केशव कमलेश चौधरी (20), सोन्या लक्ष्मण पवार (18) आणि अब्दुल मोहम्मद शेख (23) यांनी त्यांना पाहिले. तिघांनी शफिया यांना कात्रज येथील एका लॉजवर घेऊन जायचं ठरवले. मात्र लॉजवर न नेता त्यांना मांगडेवाडी येथील क्रशर खाणीजवळील डोंगरावर नेण्यात आले. त्यानंतर काही वेळातच इतर आरोपी महादेव अर्जुन व्होरडे (40), साई अमित पुजारी (19) आणि सोहेल हनीफ खान (20) तेथे पोहोचले.

advertisement

डोंगरावर नेमकं काय घडलं? 

मयत महिला आणि आरोपी डोंगरावर मद्यपान करत असताना महिलेने आपल्याला लॉजवर न नेता डोंगरावर का आणले? असा सवाल करत आरोपींसोबत वाद घातला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी संतापाच्या भरात महिलेला मारहाण केली. त्यानंतर सुमारे 50 ते 55 फूट खोल असलेल्या खाणीत त्यांना ढकलून दिल्याचा आरोप आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.

advertisement

ओळख पटू नये यासाठी  रिक्षाचे हूड बदलले

सीसीटीव्हीमध्ये ओळख पटू नये यासाठी आरोपींनी रिक्षाचे हूड बदलल्याची बाबही तपासात समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास पुणे गुन्हे शाखा आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी संयुक्तपणे केला. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने तिघा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. सदर प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.

advertisement

मृतदेह सापडल्यानंतर उलगडा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रासायनिक काजळामुळे डोळ्यांना धोका? वेळीच घ्या अशी काळजी, सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

10  फेब्रुवारी रोजी खाणीत महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत गुन्ह्याची कबुली मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune News: लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले अन्... पुण्यातील घटनेला धक्कादायक वळण; नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल