एका कॉलेज असाइन्मेंटपासून रजतला ही संकल्पना सुचली. असाइन्मेंटमध्ये त्याला फुलपाखरांचे फोटो काढून त्याबाबत माहिती गोळा करून जर्नल तयार करायचे होते. ही असाइन्मेंटपूर्ण करत असतानाच त्याची आणि निसर्गातील या रंगीबेरंगी जीवांची ओळख झाली. त्याला फुलपाखरांबाबत गोडी निर्माण झाली. हळूहळू रजतने फुलपाखरांचा रंग, आकार, हालचाली आणि जीवनचक्र यांचा अभ्यास सुरू केला.
Rakshabandhan 2025:अंधारातून शोधला आयुष्याचा प्रकाश, मुलांच्या इच्छाशक्तीला सलाम
advertisement
रजतने स्वतःच्या बागेत काही विशिष्ट प्रकारची झाडे लावून फुलपाखरांना आकर्षित करण्याचा प्रयोग सुरू केला. सध्या त्याच्या बागेत 50 हून अधिक प्रजातींची फुलपाखरे आढळतात. याच अनुभवाच्या आधारावर त्याने शहरातील इतर भागांमध्ये देखील फुलपाखरांची बाग साकारण्यास सुरुवात केली.
फुलपाखरांची बाग तयार करण्यासाठी त्याने नेक्टर प्लँट्स आणि होस्ट प्लँट्स, अशी दोन प्रकारची झाडं लावली. नेक्टर प्लँट्स म्हणजे ज्यामधून फुलपाखरे मधूरस घेतात आणि होस्ट प्लँट्स म्हणजे ज्या झाडांवर फुलपाखरं अळ्या(अंडी) घालतात. या झाडांमध्ये सिट्रस, जास्वंद, पारिजात, टॅगोअर (तगर), पुदिना, कुंभार (Keria arborea), ताग आणि अळीसाठी उपयुक्त अशा विविध वनस्पतींचा समावेश आहे.
फुलपाखरांच्या संवर्धनासाठी रजतने बटरफ्लाय वॉक, बटरफ्लाय सेशन्ससारखे जनजागृती उपक्रम हाती घेतले आहेत. तो लोकांना फुलपाखरांबद्दल माहिती देतो, त्यांना प्रत्यक्ष फुलपाखरे दाखवतो आणि त्यांच्या जीवनक्रमाविषयी माहिती देतो. विशेष म्हणजे, दरवर्षी सप्टेंबर महिना 'बिग बटरफ्लाय मंथ' म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात सर्वत्र फुलपाखरांची संख्या जास्त असते. त्यांची जैवविविधता दाखवण्यासाठी अनेक कार्यक्रम घेतले जातात.
आज शहरात प्रदूषण आणि विकासामुळे फुलपाखरांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. फुलपाखरांमुळे परागीभवन होते आणि जैवसाखळी टिकून राहते. त्यामुळे त्यांचं अस्तित्व टिकून राहणे, ही निसर्गासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
रजतने दिलेल्या माहितीनुसार, फुलपाखरांचं उद्यान तयार करण्यासाठी कमीत कमी 6-7 तास सूर्यप्रकाश असलेली जागा, पाण्याचा योग्य पुरवठा आणि योग्य झाडांची लागवड अत्यावश्यक असते. यासह बागेचे नियमित निरीक्षण आणि व्यवस्थापनही गरजेचे आहे. रजत जोशीचे हे कार्य अनेक निसर्गप्रेमींना प्रेरणा देणारे आहे.