याप्रकरणी देवेश कैलाश वर्मा (वय २७, रा. वाकड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी श्रीमंता संतोष समांता (वय ४३, मूळ रा. पश्चिम बंगाल) याला अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या काळात फिर्यादी देवेश वर्मा यांनी संशयित आरोपी श्रीमंता समांता याच्याकडे दागिने बनवण्याचे काम विश्वासाने सोपवले होते. दरम्यान, २४५ ग्रॅम सोने वितळविण्यासाठी आरोपीकडे दिले असता, त्याने त्या सोन्याचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केला. २२ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वर्मा यांनी पोलिसांत धाव घेतली.
advertisement
चिंचवड पोलिसांनी तत्परतेने तपास चक्रे फिरवून आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे स्थानिक सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, कामगारांची नेमणूक करताना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
