नियमात आणि कायद्यात चाला, नाहीतर...
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे सध्या शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देत आहेत. पुण्यातील एका मंडळाला भेट दिल्यानंतर नागरिकांना संबोधित करताना त्यांनी हा इशारा दिला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, जे लोकं कायद्याच्या विरुद्ध बाजूने चालणारे आहेत, त्यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी नियमात आणि कायद्यात चालावं नाहीतर आमची काठी आहेच... तसेच, शहरात कोणतीही आपत्तीजनक घटना होऊ देऊ नये, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
advertisement
नियमित चालणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी - पुणे सीपी
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर भाषेत इशारा देताना ते पुढे म्हणाले, "अवैध धंदे किंवा गैरकृत्य करणारे कोणी असेल तर, त्यांना आमची स्पष्ट सूचना आहे की त्यांनी मार्गे चालावे. तुमचं आमचं काही कटुता नाही." यावेळी त्यांनी सामान्य नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास दिला. "नियमित चालणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत," असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
सज्जड इशारा
दरम्यान, पोलीस आयुक्तांनी दिलेल्या या सज्जड इशाऱ्यामुळे पुणे शहरात कायद्याचे पालन न करणाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता पुण्यातील टोळक्यांची दहशत संपणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.