हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष भगत आणि त्याचा एक मित्र दोन दिवसांपूर्वी पुण्यातील बेलेकर वस्ती परिसरात असलेल्या या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी हॉटेलचा गेट उघडण्यास सांगितला, यावरून वेटरने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या किरकोळ वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झालं.
पाहा Video
advertisement
हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल
यावेळी हॉटेलचे वेटर आणि मालक यांनी आशिष भगत आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. या घटनेमुळे हॉटेलमधील शांतता भंग झाली आणि सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला. या मारहाण प्रकरणी चार जणांविरोधात हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
advertisement
Location :
Pune Cantonment (Pune Camp),Pune,Maharashtra
First Published :
December 10, 2025 1:14 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : जेवायला गेले पण मार खाऊन आले! पुण्यात हॉटेलच्या मालकाकडून 2 तरुणांना बेदम मारहाण, CCTV समोर
