तो किल्ल्यावर आला अन् तिथंच...
दशरत हा तानाजी मालुसरे समाधिस्थळावर ठेकेदाराकडे मजुरीचं काम करत होता. चार दिवसांपूर्वीच तो किल्ल्यावर आला अन् तिथंच त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अशातच आता दशरतच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. किल्ल्यावरील कल्याण दरवाजाच्या परिसरातील दरीत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.
advertisement
4 दिवसांपूर्वीच सिंहगड किल्ल्यावर...
मयत दशरथ धोत्रे हा केवळ 4 दिवसांपूर्वीच सिंहगड किल्ल्यावर कामासाठी आला होता. तो त्यांच्या इतर 4 ते 5 साथीदारांसमवेत पुरातत्व विभागाचे काम करणाऱ्या एका ठेकेदाराकडे मजूर म्हणून कार्यरत होता. हे सर्व मजूर सिंहगड किल्ल्यावरच मुक्कामाला होता आणि किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचे काम पाहत होता.
बुधवारी मध्यरात्रीपासून अचानक बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ धोत्रे हा बुधवारी मध्यरात्रीपासून अचानक बेपत्ता झाला होता. त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांना वाटलं की, तो कोणालाही न सांगता आपल्या गावी निघून गेले असावेत. दिवसभर त्याचा फोनही लागत नसल्याने त्याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही, मात्र सायंकाळी पर्यटकांना कल्याण दरवाजाच्या दरीत एक मृतदेह दिसला.
दरीतून मृतदेह बाहेर काढला
या घटनेची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाचे तानाजी भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने गडावर धाव घेतली. अत्यंत कठीण परिस्थितीत दरीतून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि स्थानिक राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. प्राथमिक तपासानुसार, तो मृतदेह बेपत्ता असलेल्या दशरथ धोत्रे याचाच असल्याचे निष्पन्न झालं.
आकस्मिक मृत्यूची नोंद
दरम्यान, राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राजेंद्र गव्हाणे यांनी सांगितले की, या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी भोर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
