व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार लहान प्लास्टिक पिचकारी अवघ्या 10 रुपयांपासून उपलब्ध आहे. या पिचकाऱ्यांचा घाऊक दर 120 रुपये डझन आहे. आकर्षक डिझाईनच्या पिचकाऱ्यांची किंमत सुमारे 50 रुपये असून कार्टून थीम असलेल्या पिचकाऱ्यांना मुलांकडून विशेष मागणी आहे. मोठ्या आकाराच्या पिचकाऱ्यांचे दर 30 रुपयांपासून 120 रुपयांपर्यंत आहेत. पाण्याची जास्त क्षमता असलेल्या आणि टँक असलेल्या पिचकाऱ्यांचे दर त्यानुसार वाढलेले दिसतात.
advertisement
रंगांच्या स्टॉलवरही ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. हर्बल गुलाल 40 रुपये डझन दराने उपलब्ध आहे. पिंक रंग 60 रुपये डझन किंवा 5 रुपये नग या दराने विकला जात आहे. कॅप्सूल डब्बी रंग, 4 बुंद रंग तसेच कपड्यांवर मारल्यानंतर सहज निघून जाणारा छुमंतर रंगही बाजारात उपलब्ध आहे. सुरक्षित आणि त्वचेला हानी न पोहोचवणाऱ्या रंगांना यंदा अधिक मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
मज्जिद बंदरमधील घाऊक बाजार हा कमी भांडवलात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय मानला जातो. येथे स्वस्त दरात माल खरेदी करून परिसरात किरकोळ विक्री केल्यास चांगला नफा मिळू शकतो.





