बोगस ओळखपत्रांचा खेळ उघड
गुप्त माहितीदाराने दिलेल्या खात्रीशीर माहितीनंतर पोलिसांनी मध्यरात्री या परिसराला वेढा घातला. ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी महिलांकडे तपासणी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली. त्यांच्याकडे चक्क बोगस आधार कार्ड आणि बनावट भारतीय कागदपत्रे आढळून आली आहेत. अनधिकृतपणे सीमा ओलांडून या महिला पुण्यात आल्या आणि कुंटणखान्यांमध्ये सक्रिय झाल्याचा पोलिसांना दाट संशय आहे.
advertisement
फक्त देहविक्रय की मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट?
पोलिसांनी केवळ महिलांनाच ताब्यात घेतले नाही, तर त्या या जाळ्यात कशा अडकल्या, याचा सखोल तपास सुरू केला आहे. यामागे एखादी मोठी आंतरराष्ट्रीय टोळी आहे का? त्यांना बोगस कागदपत्रे कोणी पुरवली? या प्रश्नांच्या उत्तरासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
११ फेब्रुवारीच्या 'ऑपरेशन कोम्बिंग'ची धास्ती
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठवड्यातही (११ फेब्रुवारी) येथे मोठी कारवाई झाली होती. त्या वेळी ७०० जणांची झाडाझडती घेण्यात आली होती. मात्र, ताजी कारवाई ही अधिक 'टार्गेटेड' असून यामुळे बुधवार पेठेतील अवैध व्यवहारांचे धाबे दणाणले आहेत.
