वारंगवाडी येथील नायरा पीजी हॉस्टेलसमोर घडलेल्या या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर लष्करे, शुभम आणि त्यांचा साथीदार (वय अंदाजे 25) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत, अशी माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे.
advertisement
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव सौरभ अनिलकुंभार सिंग (वय 24, रा. नायरा पीजी हॉस्टेल, वारंगवाडी) असं आहे. संबंधित तरुणाने गुरुवारी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सौरभ अनिलकुंभार सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पाणी घेऊन परत येत होते. त्यावेळी तिथे आलेल्या मयूर लष्करे यानी काहीच कारण नसताना फिर्यादी सौरभ याला दगडाने मारहाण केली. शुभम शेडगे आणि त्याच्या साथीदारांनी तरुणाच्या डोक्यात दगडाने वार करत हाताने आणि लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली.
सौरभ अनिलकुंभार सिंग यांच्या तक्रारीनुसार, या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. पाणी घेण्यावरून झालेल्या या मारहाणीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे
