advertisement

Pune : बायकोच्या मोबाईलमध्ये पाहिले भावाचे मेसेज, दिसता क्षणी भावाला भोसकलं, कात्रजच्या घाटात मृतदेह फेकला

Last Updated:

अनैतिक संबंधांच्या संशयातून चुलत भावाची हत्या करण्याच आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. हत्या केल्यानंतर आरोपी चुलत भावाने मृतदेह कात्रज घाटातील डोंगरात फेकून दिला.

बायकोच्या मोबाईलमध्ये पाहिले भावाचे मेसेज, दिसता क्षणी भावाला भोसकलं, कात्रजच्या घाटात मृतदेह फेकला (AI Image)
बायकोच्या मोबाईलमध्ये पाहिले भावाचे मेसेज, दिसता क्षणी भावाला भोसकलं, कात्रजच्या घाटात मृतदेह फेकला (AI Image)
पुणे : अनैतिक संबंधांच्या संशयातून चुलत भावाची हत्या करण्याच आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. हत्या केल्यानंतर आरोपी चुलत भावाने मृतदेह कात्रज घाटातील डोंगरात फेकून दिला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी भावाला अटक केली आहे. अशोक पंडित (वय 35) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. अशोक पंडित हा मूळचा झारखंडचा रहिवासी असून सध्या मोशी मध्ये राहत आहे.
हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव अजय पंडित (वय 23) आहे. अजय पंडित हादेखील मूळचा झारखंडचा असून कात्रजच्या खोपडेनगर भागात राहत होता. अजय पंडित आणि अशोक पंडित हे चुलत भाऊ आहेत. मागच्या 4 वर्षांपासून दोघेही पुण्यात मजुरीचं काम करतात. अजय पंडित हा बेपत्ता झाल्याची तक्रार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला करण्यात आली होती.
advertisement
अजय हरवल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. तांत्रिक मुद्दे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना अजयचा चुलत भाऊ अशोक पंडित याच्यावर संशय आला, त्यामुळे पोलिसांनी अशोकला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान अशोकने उडवाउडवीची उत्तरं दिली, पण पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर अशोकने आपणच अजयची हत्या केल्याची कबुली दिली.
चाकूने वार करून आपण अजयचा मृतदेह कात्रज घाटातील गुजरवाडी भागात फेकल्याची माहिती अशोकने पोलिसांना दिली. अशोकच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसराची झाडाझडती घ्यायला सुरूवात केली, तेव्हा त्यांना अजयचा मृतदेह आढळला.
advertisement

पत्नीसोबत अफेयरचा संशय

अशोकला त्याच्या पत्नीच्या चॅटमध्ये अजयसोबतचे काही मेसेज सापडले, यावरून पत्नीचं आपल्या चुलत भावासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय अशोकला आला. हे मेसेज पाहून अशोक संतापला आणि त्याने अजयचा शोध घ्यायला सुरूवात केली. अशोक आपल्याला शोधत आहे, हे समजल्यानंतर अजय कन्स्ट्रक्शन साईटवरून फरार झाला आणि दोन ते तीन दिवस लपून राहिला, पण संतापलेल्या अशोकने त्याचा शोध सुरूच ठेवला.
advertisement
बराच शोध घेतल्यानंतर अखेर अशोकला अजय दुसऱ्या कन्स्ट्रक्शन साईटवर लपून बसला आहे, अशी माहिती मिळाली. अजयचा काटा काढण्यासाठी अशोक रात्रीच्या अंधाराची वाट पाहत होता, यानंतर एक दिवस अशोक साईटवर गेला आणि अजयवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात अजयचा जागीच मृत्यू झाला, यानंतर अशोकने अजयचा मृतदेह कात्रजच्या घाटात फेकून दिला.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune : बायकोच्या मोबाईलमध्ये पाहिले भावाचे मेसेज, दिसता क्षणी भावाला भोसकलं, कात्रजच्या घाटात मृतदेह फेकला
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement