स्पर्श करून विनयभंग करण्याचा प्रयत्न
कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय पीडित महिला डॉ. साजीद शेख यांच्या घरी घरकामासाठी जात होती. तिथे काम करत असताना आरोपीने विविध कारणांनी तिला स्पर्श करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पीडितेने या गोष्टीला कडाडून विरोध केला, तेव्हा आरोपीने तिला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली.
advertisement
हात पकडून अश्लील चाळे
या त्रासाची परिसीमा तेव्हा गाठली गेली जेव्हा पीडिता आरोपीच्या घरी पाणी आणि दूध घेऊन आली होती. त्या वेळी आरोपीने तिचा हात पकडून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. या गंभीर प्रकारानंतर पीडितेने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी डॉ. साजीद शेख याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपासासाठी पोलिसांनी आता वेग वाढवला आहे.
दरम्यान, चंदननगरमध्ये आणखी एक प्रकार समोर आलाय. मित्र आणि मैत्रिणींनी एकत्र येऊन पार्टी केल्यानंतर दारूचे प्रमाण जास्त झाल्याने एका तरुणीला चालताही येत नव्हते. त्यामुळे तिच्या मैत्रिणींनी तिला तिच्या पीजीच्या पायऱ्यांपर्यंत आणून सोडले. मात्र याच परिस्थितीचा गैरफायदा घेत पीजी मालकाने तिच्याशी अभद्र वर्तन करत विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
