पथकाने तातडीने कोल्हापूर गाठलं अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांना गुप्त सूत्रांकडून गणेश वड्डा हा सध्या कोल्हापूर येथे लपून बसला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पुणे पोलिसांच्या पथकाने तातडीने कोल्हापूर गाठलं आणि अत्यंत शिताफीने कोल्हापूरमधील भुदरगड येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
घातक शस्त्रसाठा जप्त
advertisement
या कारवाईदरम्यान, आंदेकर टोळीशी संपर्कात असलेल्या एका अल्पवयीन तरुणाची पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाकडून दोन गावठी बनावटीचे पिस्तूल (देशी कट्टा), एक लोखंडी धारदार कुकरी आणि काळचा रंगाचे एअर पिस्तूल असा घातक शस्त्रसाठा जप्त केला आहे.
आरोपी गणेश वड्डाला अटक
फरार आरोपी गणेश वड्डा याच्या अटकेमुळे आणि अल्पवयीन मुलाकडून शस्त्रसाठा जप्त केल्यामुळे आंदेकर टोळीच्या कारवायांना मोठा धक्का बसला आहे. दोन वर्षांपासून तो बेपत्ता होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि या टोळीच्या पुणे आणि कोल्हापूरमधील कनेक्शनची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
आंदेकर टोळीमधून निवडणूक कोण लढवणार?
दरम्यान, आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरूंगात असलेलं आंदेकर कुटुंबातील माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर हे देखील निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. अशातच पुणे पोलिसांनी आणखी फास आवळ केला असून आंदेकरांच्या अडचणी वाढवल्या आहेत.
