Pune Crime News : अभिजीत पोते, पुणे प्रतिनिधी : अनेक वर्षापूर्वी एक सिनेमा आला होता. या सिनेमाचे नाव दृश्यम होते. या सिनेमात अजय देवगण शिताफीने तरूणाचा खुन करतो आणि त्याचा मृतदेह नवीन बांधकाम सूरू असलेल्या पोलीस स्टेशन पुरतो.अशाच काहीशा पॅटर्नचा वापर करून पुण्यातील एक इसम आपल्या बायकोची हत्या करतो.या हत्ये दरम्यान आपल्यावर कोणताही संशय येऊ नये यासाठी तो खुप भयानक प्लांनिग करतो. मात्र इतकी प्लानिंग करून देखील तो एक चूक करून बसतो. कारण या हत्या प्रकरणात आता पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला आहे.
advertisement
ही घटना पुण्याच्या वारजे पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. या घटनेतील आरोपी समीर पंजाबराव जाधव यांची बायको अंजली समीर जाधव हीचा एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध सूरू असल्याचा संशय होता. विशेष म्हणजे बायको मोबाईलवरील चॅट्स पाहिल्यानंतर दोघांमध्ये अनेकदा वाद देखील झाले होते. या वादानंतरही बायको सुधारणार नाही हे लक्षात आल्यानंतर समीर जाधव यांनी बायकोचा काटा काढण्याचा कट रचला होता. त्यासाठी त्याने शिंदेवाडी येथे १८ हजार रुपये भाड्याने एक गोदाम घेतले, लोखंडी बॉक्स तयार करून तिथे ठेवला आणि लाकडाची पोती आणून ठेवल्यानंतर खुनाची तयारी केली होती.
सगळी प्लानिंग झाल्यानंतर आरोपीने २६ ऑक्टोबर रोजी अंजलीला कारमध्ये फिरायला नेले. नवले ब्रिजमार्गे खेडशिवापूर, मरीआई घाट परिसरात फिरवल्यानंतर परतीच्या प्रवासात शिंदेवाडी येथे थांबून भेळ खाण्याचा बहाणा केला. गोडाऊनमध्ये चटईवर बसून दोघे भेळ खात असताना त्याने अचानक तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पत्नीचा मृतदेह लोखंडी बॉक्समध्ये टाकून पेट्रोल ओतून जाळला. राख नदीपात्रात टाकली आणि बॉक्स स्क्रॅपमध्ये विकला होता.
यानंतर आरोपीने पतीने स्वतः पुरावे नष्ट करून पोलिसांत बायको हरवल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलीस आरोपीचा शोध घेत होता.या दरम्यानच एक सीसीटीव्ही समोर आला आहे.भेळ खाण्यासाठी गेलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही समोर आला आहे. या व्हिडिओ मध्ये आरोपी पती त्याच्या पत्नीला घेऊन जात असल्याचे आले समोर आले आहे. त्यानंतरल भेळ खात असताना पती ने पत्नीचा गळा दाबून खून केला आहे.त्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा हाती लागला आहे.त्यामुळे आता या घटनेचा उलगडा होणार आहे.
