TRENDING:

दुकानात बसलेला तरुण अचानक धावत सुटला अन्..., मोरगावमध्ये पोलीस चौकीसमोरच हादरवणारी घटना

Last Updated:

मोरगाव पोलीस मदत केंद्राच्या अगदी समोरच एका अज्ञात तरुणाने धावत्या टेम्पोखाली उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे बुधवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली. मोरगाव पोलीस मदत केंद्राच्या अगदी समोरच एका अज्ञात तरुणाने धावत्या टेम्पोखाली उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
तरुणाने धावत्या टेम्पोखाली उडी मारली (AI Image)
तरुणाने धावत्या टेम्पोखाली उडी मारली (AI Image)
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सुपा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मोरगाव पोलीस मदत केंद्राजवळ बुधवारी सकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. येथील एका दुकानात बसलेला तरुण अचानक उठून रस्त्याच्या दिशेने धावला. समोरून येणारा भरधाव टेम्पो पाहून त्याने कसलाही विचार न करता थेट गाडीच्या चाकाखाली उडी घेतली. टेम्पोचे चाक अंगावरून गेल्याने तरुणाचा जागीच करुण अंत झाला.

advertisement

पोलिसांचा प्राथमिक अंदाज

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली. मृत तरुण हा स्थानिक नसून परजिल्ह्यातील असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, त्याचे नाव आणि त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून ओळखीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

सीसीटीव्ही फुटेज आणि तपास

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
...तर खरी शिवजयंती साजरी होईल, शिव व्याख्याते बांगर यांचं परखड भाष्य, Video
सर्व पहा

ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली असून, पोलिसांनी ते फुटेज ताब्यात घेतले आहे. सुपा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सध्या 'आकस्मिक मृत्यू'ची नोंद करण्यात आली आहे. भरचौकात आणि पोलीस मदत केंद्राच्या अगदी समोरच घडलेल्या या घटनेमुळे मोरगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या/पुणे/
दुकानात बसलेला तरुण अचानक धावत सुटला अन्..., मोरगावमध्ये पोलीस चौकीसमोरच हादरवणारी घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल