TRENDING:

पुण्यातील सलून व्यावसायिकानं संपवलं आयुष्य; आता पत्नीविरोधातच गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

Last Updated:

पत्नीसोबतच्या सततच्या भांडणांना कंटाळून एका ४० वर्षीय सलून मालकाने आत्महत्या केली. त्याने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: कौटुंबिक वादाचे रूपांतर एका भीषण दुर्घटनेत झालं असून, पत्नीसोबतच्या सततच्या भांडणांना कंटाळून एका ४० वर्षीय सलून मालकाने आत्महत्या केली. त्याने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. २ फेब्रुवारी रोजी शिवणे येथील दांगट इस्टेटमधील एका सोसायटीत ही घटना घडली होती. याप्रकरणी आता वारजे पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पतीची आत्महत्या (AI Image)
पतीची आत्महत्या (AI Image)
advertisement

काय आहे नेमकं प्रकरण?

महेश दत्तात्रय क्षीरसागर (वय ४०, रा. गिरीधरनगर, वारजे माळवाडी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. महेश यांचे लग्न १३ वर्षांपूर्वी झाले होते. मात्र, लग्नानंतर काही काळानंतर पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून खटके उडू लागले. महेश यांचे वडील दत्तात्रय बाबूराव क्षीरसागर (वय ६८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महेश आणि त्यांची पत्नी प्रतिभा महेश क्षीरसागर (वय ३५) यांच्यात वारंवार भांडणे होत होती.

advertisement

सततच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल

महेश क्षीरसागर हे शिवणे परिसरातील दांगट इस्टेट येथील एका सोसायटीत वास्तव्यास होते. पती-पत्नीमधील वादाने इतके भीषण स्वरूप धारण केले की, महेश यांनी मानसिक तणावातून २ फेब्रुवारी रोजी राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला या प्रकरणाची नोंद झाली असली तरी, पोलिसांच्या सखोल तपासानंतर आणि वडिलांच्या तक्रारीनंतर आता पत्नीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

advertisement

पोलिसांकडून गुन्हा दाखल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रासायनिक काजळामुळे डोळ्यांना धोका? वेळीच घ्या अशी काळजी, सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

वारजे माळवाडी पोलिसांनी मंगळवारी प्रतिभा क्षीरसागर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक लुगडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. १३ वर्षांच्या सुखी संसाराचा असा करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील सलून व्यावसायिकानं संपवलं आयुष्य; आता पत्नीविरोधातच गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल