22 वर्षीय अभिषेक राजाराम श्रीनामे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी भगवान अशोक घनाते यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. भगवान घनाते हे रिक्षा चालक असून त्यांनी आपल्या घरासमोर रिक्षा आणि दुचाकी पार्क केल्या होत्या. त्यांच्या भावांच्या दुचाकीही त्याच ठिकाणी पार्क होत्या. दरम्यान संशयित अभिषेक श्रीनामे यांनी फिर्यादींची रिक्षा, दुचाकी तसेच त्यांच्या भावांच्या दुचाकींना आग लावल्याचा आरोप केला आहे.
advertisement
दुचाकींना आग लावल्यानंतर ही आग स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या सहकार्याने आटोक्यात आणण्यात आली मात्र त्या आगीत चार दुचाकी आणि एक रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली होती. या आगीत सुमारे 3 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तपास सुरू केला आहे. फुटेजवरून दिसते की संशयित अभिषेक श्रीनामे यांनी वाहने पेटवण्यासाठी पेट्रोलचा वापर केला होता.






