TRENDING:

पुण्यात भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या वेदांतसोबतच नको ते घडलं घडलं, अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने सपासप वार अन्..

Last Updated:

"आम्ही इथले दादा आहोत," असं सांगत आरोपींनी तरुणावर कोयता आणि दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नवी सांगवीतील राजाराम नगर येथे घडली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : दोघांचं भांडण मिटवून तडजोड घडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला मध्यस्थी करणे चांगलेच महागात पडले आहे. "आम्ही इथले दादा आहोत," असं सांगत आरोपींनी तरुणावर कोयता आणि दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नवी सांगवीतील राजाराम नगर येथे घडली.
तरुणावर कोयत्याने हल्ला (AI Image)
तरुणावर कोयत्याने हल्ला (AI Image)
advertisement

नेमकी घटना काय?

गुरुवारी (१९ फेब्रुवारी) दुपारी एकच्या सुमारास वाघजाई चौक परिसरातील राजाराम नगरमध्ये अंशुमन कागडा आणि विकास ऊर्फ विशु कांबळे यांच्यात वाद सुरू होता. हे भांडण मिटवण्यासाठी वेदांत मदने हा तरुण आपल्या काही मित्रांसह तिथे गेला होता. दोघांमधील वाद मिटवून शांतता प्रस्थापित करण्याचा त्याचा प्रयत्न होता.

पुणेकरांनो आता घरातही सावधच बसा! भरधाव डंपर काळ बनून घरात घुसला, महिलेचा जागीच मृत्यू

advertisement

कोयत्याने सपासप वार

वेदांत मध्यस्थी करत असल्याचे पाहून आरोपी प्रथमेश गणेश शिंदे (१९) आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा राग अनावर झाला. "आम्ही इथले भाई आहोत," असे ओरडत त्यांनी परिसरात दहशत माजवली. यावेळी जुन्या रागातून त्यांनी वेदांतवर कोयत्याने सपासप वार केले आणि दगडाने मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले.

पोलीस कारवाई

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata आता करणार मार्केट जाम, आणली 468 किमी मायलेजदार SUV; किंमतही 6 लाखांपासून
सर्व पहा

या भीषण हल्ल्यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी वेदांतच्या आईने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रथमेश शिंदे याच्यासह दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या वेदांतसोबतच नको ते घडलं घडलं, अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने सपासप वार अन्..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल