कृष्णाला व्हॉट्सअॅप कॉल केला अन्...
समोर आलेल्या माहितीनुसार, कृष्णा आंदेकरने रुमसाठी 5000 रुपये देऊन काळे याला मोहितेसोबत आंबेगाव पठार परिसरात पाठवलं होतं. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता काळेने वनराज यांचा खून करणाऱ्या आरोपींच्या घराचे रेकी केली अन् घरं पाहिली. त्याची माहिती काळेने कृष्णाला व्हॉट्सअॅप कॉलद्वारे दिली. त्या वेळी कृष्णाने अमनला पाठवतो, असं काळेला कळवलं. मात्र, अमन आला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी काळेने परत कृष्णाला वारंवार फोन केल्याचं पोलिसांनी केलेल्या तपासात पहायला मिळतंय.
advertisement
सात ते आठ जण हत्यारं घेऊन पाठवतो
कृष्णा फोनच उचलत नसल्याचं पाहिल्यावर काळे याने यश पाटील याला कॉल केला. त्यावेळी पाटीलने काळेला अमनला कॉल करण्यास सांगतो, असं कळवलं होतं. पाटीलने कॉल केल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता काळेला कॉल केला गेला. त्यावेळी सात ते आठ जणांना पाच हत्यारं घेऊन पाठवले आहे असं सांगितलं. तर अमळने कॉल करून लक्ष ठेवा बाहेर आला की कळवा असं कळवलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.
नेमका कुणाचा गेम होणार होता?
दरम्यान, या प्रकरणात कृष्णा आंदेकर टोळी नेमका कोणाचा गेम वाजवणार होती? याचा शोध पोलीस घेताना दिसत आहेत. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाकडे गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.