TRENDING:

Pune Crime: 'तुझे ते फोटो व्हायरल करेल'; धमकीला घाबरून पुण्यातील तरुणीनं त्याचं सगळं ऐकलं अन् शेवटी नको ते घडलं

Last Updated:

मुंढवा परिसरात राहणाऱ्या या तरुणीने काही महिन्यांपूर्वी एका लोन ॲपच्या माध्यमातून कर्ज घेतलं होतं. हेच कर्ज फेडण्यासाठी तिला आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून फोन आले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : तुम्ही तुमच्या नावावर कुठलं लोन घेतलं असेल आणि ते भरण्यासाठी तुम्हाला अनोळखी नंबरहून कॉल येत असतील तर सावध व्हा आणि आधी खात्री करा. पुण्यात पुन्हा एकदा सायबर चोरट्यांनी डोकं वर काढलं आहे. आता चोरट्यांनी एका २९ वर्षीय तरुणीला तिच्याच खाजगी फोटोंचा वापर करून 'ब्लॅकमेल' केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पुणेकर सायबर सुरक्षेच्या बाबतीत पुन्हा एकदा चिंतेत पडले आहेत.
पुण्यातील तरुणीची फसवणूक (प्रतिकात्मक फोटो)
पुण्यातील तरुणीची फसवणूक (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

मुंढवा परिसरात राहणाऱ्या या तरुणीने काही महिन्यांपूर्वी एका लोन ॲपच्या माध्यमातून कर्ज घेतलं होतं. हेच कर्ज फेडण्यासाठी तिला आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून फोन आले. तरुणीने हे फोन उचलताच त्यांनी कर्जाची रक्कम भरण्यास सांगितलं. तरुणीनं ही रक्कम दिलीही. मात्र, हे सगळं इथे थांबलं नाही. पुन्हा पुन्हा आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधत, या भामट्यांनी तरुणीच्या मोबाईलमधील तिचे खाजगी फोटो 'मॉर्फ' (एडिट) करून ते तिच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

"पैसे दिले नाहीत, तर तुझे मॉर्फ फोटो व्हायरल करू," अशी भीती दाखवून या तरुणीकडून वारंवार पैशांची उकळणी करण्यात आली. अखेर बदनामीच्या भीतीने पिचलेल्या तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पुण्यातून गेल्या काही दिवसांपासून सायबर फसवणुकीच्याही अनेक मोठ्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे, कोणत्याही अनोळखी लोन ॲपला परवानगी देऊ नका आणि संशयास्पद गुंतवणुकीच्या स्कीमला बळी पडू नका. सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहण्यासाठी सतर्क राहणं, हाच एकमेव उपाय आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: 'तुझे ते फोटो व्हायरल करेल'; धमकीला घाबरून पुण्यातील तरुणीनं त्याचं सगळं ऐकलं अन् शेवटी नको ते घडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल