नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर नेहमीच्या चालकाऐवजी एक बदली चालक स्कूल व्हॅन घेऊन आला होता. व्हॅनमधील इतर सर्व मुलांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर, या नराधम चालकाने पीडित मुलीला मुद्दाम पुढच्या सीटवर बसवले. गाडी चालवत असतानाच त्याने मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. प्रसंगावधान राखून मुलीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले.
advertisement
Pune Crime: कुत्र्यासाठी एकमेकांशी भिडले पुण्यातील तरुण; रस्त्यावरच दगड, दांडक्याने जीवघेणा हल्ला
मुलीची परिस्थिती पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी व्हॅन थांबवून चालकाला चांगलाच चोप दिला. त्याचवेळी सतर्क नागरिकांनी तातडीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून व्हॅनचा नंबर कळवला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे पालकांची चिंता वाढली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्कूल व्हॅनमध्ये मुलं सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पालकांना पडला आहे.
