TRENDING:

पहाटेचे 4 वाजलेले; सगळीकडे शांतता, अचानक पुण्यातील त्या सोसायटीत येऊ लागले मोठे आवाज, दरवाजा उघडताच हादरले लोक

Last Updated:

पहाटेची शांतता असतानाच सोसायटीच्या तळमजल्यावरून अचानक मोठे आवाज येऊ लागले आणि धुराचे लोट उठले

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात धानोरी परिसरातील एका सोसायटीत शुक्रवारी पहाटे झालेला मोठा स्फोट आणि आगीच्या ज्वाळांनी रहिवाशांची झोप उडवली. या प्रकरणात जुना वाद उकरून काढत रागात सोसायटीतील वाहने पेटवून देणाऱ्या एका नराधमाला विश्रांतवाडी पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. विशाल राजेश खलसे (वय १९, रा. परांडेनगर, धानोरी) असे या संशयित आरोपीचे नाव आहे.
'प्रियांश अपार्टमेंट'च्या आवारात धक्कादायक घटना (प्रतिकात्मक फोटो)
'प्रियांश अपार्टमेंट'च्या आवारात धक्कादायक घटना (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकी घटना काय?

१३ मार्च रोजी पहाटे चारच्या सुमारास धानोरी रस्त्यावरील 'प्रियांश अपार्टमेंट'च्या आवारात ही थरारक घटना घडली. पहाटेची शांतता असतानाच सोसायटीच्या तळमजल्यावरून अचानक मोठे आवाज येऊ लागले आणि धुराचे लोट उठले. घाबरलेले रहिवासी धावत घराबाहेर आले असता, तिथे लावलेली वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे त्यांना दिसले. अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर जवानांनी तातडीने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.

advertisement

या आगीत तब्बल सहा वाहने जळून खाक झाली असून, सोसायटीतील वीज वाहिनी आणि इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. तक्रारदार तरुणाने दिलेल्या माहितीवरून विशाल खलसे याच्यावर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी तातडीने हालचाली करत विशालला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या विशालने चौकशीअंती तक्रारदार तरुणाशी असलेल्या जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांनी दिली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोनदा अपयश पण जिद्द नाही सोडली, पुण्याच्या आर्याने कंपनी सेक्रेटरी परीक्षेत मिळवलं यश, Video
सर्व पहा

सोसायटीतील निष्पाप नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विशाल खलसे याच्यावर आता कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे. पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
पहाटेचे 4 वाजलेले; सगळीकडे शांतता, अचानक पुण्यातील त्या सोसायटीत येऊ लागले मोठे आवाज, दरवाजा उघडताच हादरले लोक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल