पुणे रेल्वे स्थानकावरून दरवर्षी या सणांच्या काळात गर्दी होणे ही एक सामान्य बाब आहे. याचा विचार करून रेल्वे प्रशासनाने गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला असून पुणे–हजरत निजामुद्दीन आणि हजरत निजामुद्दीन–पुणे मार्गावर दर आठवड्याला ठराविक फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. या अतिरिक्त गाड्या प्रवाशांना सणाच्या काळात सुखद आणि सोयीस्कर प्रवासाची संधी देतील.
जाणून घ्या विशेष रेल्वेचे वेळापत्रक
advertisement
गाडी क्रमांक 01493 ही पुणे–हजरत निजामुद्दीन मार्गावर धावणारी एसी विशेष गाडी आहे. ही गाडी 6 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबरपर्यंत दर बुधवार आणि गुरुवारी पुणे रेल्वे स्थानकावरून सायंकाळी 5.30 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी रात्री 8.00 वाजता ही गाडी हजरत निजामुद्दीन स्थानकावर पोहोचेल. सणांच्या काळात या गाडीच्या एकूण 12 फेऱ्या ठरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रवासाची पूर्वतयारी करण्यास अधिक सोय होईल.
तसंच गाडी क्रमांक 01494 ही हजरत निजामुद्दीन–पुणे मार्गावर धावणारी विशेष रेल्वे आहे. ही गाडी 7 ऑक्टोबरपासून 14 नोव्हेंबरपर्यंत दर मंगळवार आणि शुक्रवारी रात्री 9.25 मिनिटांनी हजरत निजामुद्दीन स्थानकावरून पुणेच्या दिशेने रवाना होईल तर दुसऱ्या दिवशी रात्री 11.55 वाजता ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचेल. सणांच्या काळात या गाडीच्या एकूण 12 फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्यांमध्ये एसी कोचेसची व्यवस्था केली असून सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या आहेत. प्रवाशांनी आपल्या तिकिटांचे आरक्षण वेळेत करणे महत्त्वाचे असून गर्दीच्या काळात तिकीट मिळविण्यासाठी लवकर आरक्षण करणे फायदेशीर ठरेल.
सणांच्या काळात प्रवाशांना प्रवासात अधिक वेळ लागू शकतो, त्यामुळे नियोजनपूर्वक प्रवास करण्याची शिफारस रेल्वे प्रशासनाकडून केली जाते. पुणे–हजरत निजामुद्दीन मार्गावर विशेष गाड्या धावल्यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन सोपे होईल आणि सणांच्या गर्दीत अडथळा येणार नाही. या अतिरिक्त गाड्यांमुळे पुणे–हजरत निजामुद्दीन मार्गावरील प्रवाशांना प्रवासाची अधिक सुरक्षित आणि आरामदायी संधी मिळणार आहे. तसेच सणांच्या काळात प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा देणे हे रेल्वे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची सुविधा अधिक सुधारली आहे. प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घेऊन सणांच्या काळात आपल्या गंतव्यस्थानी सुरक्षित आणि वेळेवर पोहोचावे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासाची माहिती देण्यासाठी संपर्क कार्यालयाद्वारे अपडेट्स दिले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते.
