TRENDING:

मुळशीत मृत्यूचं तांडव! रिंग रोडचा डंपर थेट घरावर उलटला; महिलेचा जागीच दुर्दैवी अंत

Last Updated:

रिंग रोडच्या कामादरम्यान सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे:   मुळशी तालुक्यात रिंग रोडच्या सुरू असलेल्या कामादरम्यान बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. भरावाचे काम करणारा एक डंपर चालकाचा ताबा सुटल्याने थेट कडेला असलेल्या घरावर उलटला. या भीषण अपघातात घरात असलेल्या एका महिलेचा ढिगाऱ्याखाली दबून जागीच मृत्यू झाला. नंदा जगन्नाथ मालपोटे असं या दुर्घटनेत मृत पावलेल्या महिलेच नाव आहे.घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे.
News18
News18
advertisement

समोर आलेल्या माहितीनुसार, रिंग रोडच्या कामासाठी बुधवारी सकाळी डंपरद्वारे माती टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी मातीचा भराव टाकत असताना डंपर अचानक घसरला आणि कडेला असलेल्या एका घरावर जाऊन कोसळला. डंपरच्या वजनाने घराचा काही भाग पूर्णपणे कोसळला. यावेळी घरात असलेल्या महिलेला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि त्या ढिगाऱ्याखाली अडकल्या. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले, मात्र अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की महिलेचा जीव वाचू शकला नाही.

advertisement

सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन

घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. रिंग रोडच्या कामादरम्यान सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अवजड वाहनांची बेकायशीर वाहतूक आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळेच हा निष्पाप बळी गेल्याची भावना स्थानिक व्यक्त करत आहेत.

advertisement

दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रासायनिक काजळामुळे डोळ्यांना धोका? वेळीच घ्या अशी काळजी, सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मृत महिलेच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत आणि योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या/पुणे/
मुळशीत मृत्यूचं तांडव! रिंग रोडचा डंपर थेट घरावर उलटला; महिलेचा जागीच दुर्दैवी अंत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल