रमेश (वय ५३) आणि पुजा (वय ५१) (नावे बदललेली) यांचा विवाह १९९६ मध्ये झाला होता. लग्नाच्या काही वर्षांनंतर पत्नीकडून छळ सुरू झाल्याचा आरोप पतीने केला होता. पत्नी स्वतःला इजा करून आत्महत्येचा प्रयत्न करायची, तसेच तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आल्यावर पतीने ॲड. राणी कांबळे-सोनावणे यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली होती.
advertisement
न्यायालयाचा निकाल आणि मुलांचा ताबा: पतीने घटस्फोटासोबतच मुलांच्या ताब्याचीही मागणी केली होती. यावर निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, दाम्पत्याचा २५ वर्षांचा मुलगा आता सज्ञान असून तो परदेशात शिक्षण घेत आहे, त्यामुळे त्याच्या ताब्याचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र, दहावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलीच्या बाबतीत न्यायालयाने 'बालकाचे कल्याण' हे तत्त्व केंद्रस्थानी ठेवले. मुलीला या वयात वडिलांपेक्षा आईची गरज अधिक असल्याचे नमूद करत न्यायालयाने तिचा ताबा आईकडेच राहू दिला.
"पत्नीपासून होणाऱ्या त्रासातून पतीची सुटका झाली याचा मोठा आनंद आहे, न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य आहे," अशी प्रतिक्रिया पतीच्या वकील ॲड. राणी कांबळे-सोनावणे यांनी दिली.
