पहाटे दूध टाकायला आला अन् घरात घुसून हादरवणारं कांड! CCTV फुटेज पाहून पोलीसही थक्क, पुण्यातील धक्कादायक घटना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास दूध देण्यासाठी आलेली एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना कॅमेऱ्यात कैद झाली होती. या धाग्यादोऱ्यावरून पोलिसांनी तपास चक्रे फिरवली
पुणे : पुणे शहरातील विमाननगर परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये अजब चोरीची घटना घडली. यात दूध टाकण्याच्या बहाण्याने घरफोडी करणाऱ्या चोरट्याला विमानतळ पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून चोरीची १ लाख ३२ हजार रुपयांची संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली असून, पोलिसांनी अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा छडा लावला आहे.
नेमकी घटना काय?
विमाननगर येथील 'अमिनन्स बाय नाईकनवरे' या उच्चभ्रू सोसायटीत राहणारे सूर्यनारायण राजरतिलम यांच्या घरातून शनिवारी (१७ जानेवारी) १ लाख ३२ हजार रुपयांची रोकड चोरीला गेली होती. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
advertisement
सीसीटीव्हीने उघड केला बनाव: पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड आणि त्यांच्या पथकाने सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास दूध देण्यासाठी आलेली एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना कॅमेऱ्यात कैद झाली होती. या धाग्यादोऱ्यावरून पोलिसांनी तपास चक्रे फिरवून व्यंकटेश वसंत करंडे (वय ३४, रा. वडगावशेरी) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने दुधवाल्याच्या वेशात चोरी केल्याची कबुली दिली.
advertisement
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव आणि पोलीस निरीक्षक शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीचा संपूर्ण ऐवज हस्तगत केला आहे. उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये घरकाम करणारे किंवा सेवा देणारे लोक अशा प्रकारे चोरी करू शकतात, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 7:14 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पहाटे दूध टाकायला आला अन् घरात घुसून हादरवणारं कांड! CCTV फुटेज पाहून पोलीसही थक्क, पुण्यातील धक्कादायक घटना






