मध्यरात्री मोठी घडामोड, ठाकरेंच्या नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा संपर्कात, सरिता म्हस्के नेमक्या होत्या कुठे?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Sarita Mhaske News: गेल्या काही तासांपासून 'नॉट रिचेबल' असलेल्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के अखेर पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात आल्या आहेत.
राज्यात सत्तासंघर्ष आणि पक्षफुटीचे वारे वाहत असताना, मुंबईतील राजकीय वर्तुळातून ठाकरे गटासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही तासांपासून 'नॉट रिचेबल' असलेल्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के अखेर पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात आल्या आहेत. त्या मागील काही दोन दिवसांपासून त्या कुणाच्याच संपर्कात नव्हत्या. आज पहाटे तीन ते चार च्या सुमारास त्या ठाकरे गटाच्या संपर्कात आल्या आहेत. त्या ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी आल्या होत्या.
नेमकं प्रकरण काय होतं?
बुधवारी मुंबईतील कोकण भवन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या ६५ नगरसेवकांची अधिकृत गट नोंदणी प्रक्रिया पार पडली. या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेदरम्यान, मुंबईच्या प्रभाग क्रमांक १५७ मधून 'मशाल' चिन्हावर निवडून आलेल्या डॉ. सरिता म्हस्के गैरहजर होत्या. त्या अचानक गायब झाल्याने आणि त्यांचा फोन लागत नसल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली होती.
advertisement
पक्षाच्या नेत्यांकडून त्यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र त्या प्रतिसाद देत नव्हत्या. याच काळात त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. गट नोंदणीच्या वेळी महत्त्वाच्या नगरसेविकेचे गैरहजर राहणे ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय ठरला होता.
मध्यरात्री घडल्या वेगवान हालचाली
advertisement
दिवसभर सुरू असलेल्या या नाट्यमय घडामोडींनंतर मध्यरात्री या प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली. डॉ. सरिता म्हस्के या मध्यरात्री शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या. त्यांच्या या भेटीमुळे त्या पुन्हा पक्षात सक्रिय झाल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांच्या संपर्कात त्या होत्या. लांडे यांच्याकडून त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात होता, असंही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
advertisement
स्पष्टीकरणाकडे सर्वांचे लक्ष
निवडून आल्यानंतर अचानक नॉट रिचेबल होण्यामागे आणि शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेमागे नक्की काय कारण होतं? याबाबत आता स्वतः डॉ. सरिता म्हस्के काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 7:06 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मध्यरात्री मोठी घडामोड, ठाकरेंच्या नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा संपर्कात, सरिता म्हस्के नेमक्या होत्या कुठे?








