दर्शनासाठी आळंदीला निघालेली महिला; सोन्याच्या दागिन्यांची बॅग रस्त्यातच हरवली, 'माऊलीं'नी शोधून केली परत

Last Updated:

प्रवासादरम्यान आळंदी फाटा येथे मुलांसाठी नाश्ता घेण्यासाठी ते थांबले. यावेळी गाडीतून उतरताना पल्लवी रोकडे यांच्या मांडीवर असलेली बॅग नकळत रस्त्यावर पडली

हरवलेली बॅग मिळाली परत (AI Image)
हरवलेली बॅग मिळाली परत (AI Image)
पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील आळंदी फाट्याजवळ हरवलेली दागिन्यांची बॅग दक्षिण महाळुंगे वाहतूक पोलिसांनी अवघ्या काही तासांत शोधून संबंधित महिलेला परत केली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे आणि प्रामाणिकपणामुळे एका कुटुंबाचे लाखो रुपयांचे दागिने सुरक्षित मिळाले आहेत. या घटनेनंतर 'पोलीस आमच्यासाठी माऊलीच्या रूपात धावून आले' अशी भावना महिलेने व्यक्त केली आहे.
नेमकी घटना काय?
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सतीश रोकडे हे पत्नी पल्लवी आणि मुलांसह चारचाकीने आळंदी दर्शनासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान आळंदी फाटा येथे मुलांसाठी नाश्ता करण्यासाठी ते थांबले. यावेळी गाडीतून उतरताना पल्लवी रोकडे यांच्या मांडीवर असलेली बॅग नकळत रस्त्यावर पडली. बॅग पडल्याचे लक्षात न आल्याने रोकडे कुटुंब पुढे दर्शनासाठी निघून गेले.
advertisement
रस्त्यावर पडलेली ही बॅग एका सुजाण नागरिकाला सापडली, त्याने ती तात्काळ तिथे ड्युटीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक नामदेव गाडे यांच्याकडे सुपूर्द केली. पोलिसांनी बॅगेची तपासणी केली असता, त्यात दोन तोळे सोन्याची पोत, नथ, बाळी, चांदीचे पैंजण आणि रोख रक्कम असा मौल्यवान ऐवज आढळला. बॅगेत असलेल्या एका व्हिजिटिंग कार्डच्या आधारे पोलिसांनी सतीश रोकडे यांच्याशी संपर्क साधला.
advertisement
संपर्क होताच रोकडे दाम्पत्य आळंदीहून परतले आणि स्पायसर चौक येथील वाहतूक पोलीस चौकीत हजर झाले. पोलीस निरीक्षक नीलेश वाघमारे यांच्या उपस्थितीत योग्य खातरजमा करून हा सर्व ऐवज त्यांना सुखरूप परत करण्यात आला. पोलिसांनी दाखवलेल्या या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
दर्शनासाठी आळंदीला निघालेली महिला; सोन्याच्या दागिन्यांची बॅग रस्त्यातच हरवली, 'माऊलीं'नी शोधून केली परत
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement