Pune Crime: दुकानासमोर उभे होते दोघं; हालचालींमुळे संशय, जवळ जाताच समजलं तरुणांचं असं कांड की पोलीसही चक्रावले
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये किरण दत्तात्रय इंगळे (वय २३, रा. दहिवडी) याच्यासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सणसवाडी परिसरात अमली पदार्थांच्या विरोधात शिक्रापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे-नगर महामार्गावर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन युवकांना पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडलं आहे. त्यांच्याकडून गांजाचा साठा आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी दोन तरुण सणसवाडी भागात येणार असल्याची गोपनीय माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार दामोदर होळकर, राकेश मळेकर आणि मच्छिंद्र निचित यांच्या पथकाने महामार्गालगतच्या एका दुकानासमोर सापळा रचला. यावेळी दोन संशयित युवक दुचाकीसह तिथे आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
advertisement
पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये किरण दत्तात्रय इंगळे (वय २३, रा. दहिवडी) याच्यासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. सुरुवातीला या दोघांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र त्यांच्या जवळील पिशवीची झडती घेतली असता पोलिसांना गांजाच्या पुड्या आढळून आल्या. पोलिसांनी आरोपींजवळील एमएच १२ वायपी ०२५३ क्रमांकाची दुचाकी, दोन मोबाईल फोन आणि गांजाचा साठा असा मुद्देमाल जप्त केला आहे.
advertisement
याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सणसवाडी परिसरात काही महिन्यांपूर्वी गुटख्यावर मोठी कारवाई झाली होती, आता गांजा पकडल्याने या भागात अमली पदार्थ विक्रीचे जाळे पसरले असल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 9:23 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: दुकानासमोर उभे होते दोघं; हालचालींमुळे संशय, जवळ जाताच समजलं तरुणांचं असं कांड की पोलीसही चक्रावले







