Weather Alert: ठाणे, बदलापुरात हुडहुडी, कल्याण-डोंबिवलीतील हवामानात मोठे बदल, आजचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: ठाणे-मुंबईसह राज्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. कल्याण-डोंबिवलीसह परिसरातील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
राज्यातील हवामानात जानेवारीच्या उत्तरार्धात मोठे बदल जाणवत आहेत. सकाळी गारठा, दुपारी वाढलेली उष्णता आणि संध्याकाळी पुन्हा थंडी जाणवतेय. तर काही ठिकाणी हलके धुके आणि किंचित थंडावा कायम आहे. मुंबईत 21जानेवारी रोजी थंडीचा जोर कमी होऊन तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. तर ठाण्यात पुढील 2 दिवस गारठा जणवेल. बुधवारी कल्याण-डोंबिवलीसह परिसरातील हवामान कसं राहील? जाणून घेऊ.

advertisement
2/5
कल्याण तालुक्यात हवामान उबदार आणि कोरडे असून काही ठिकाणी उशिरापर्यंत धुके अनुभवायला मिळेल. किमान तापमान 17 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस राहील. थंडीचा वेग कमी होऊन दिवसा हवामान सुखद आणि आरामदायी असून रात्री किंचित थंडीचा अनुभव येईल.

3/5
डोंबिवली शहरातील हवामान स्वच्छ आणि आल्हाददायक राहील. किमान तापमान 21 अंश सेल्सिअस तर कमाल 34 अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा वेग कमी-जास्त होत असल्याने हवामानात देखील बदल जाणवत आहेत.

4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात हवामान स्वच्छ आणि स्थिर राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 15 अंश सेल्सिअस तर कमाल 33 अंश सेल्सिअस राहील. पुढील काही दिवस तापमान स्थिर राहील. थंडीची लाट नसली तरी सकाळ आणि संध्याकाळ सुखद हवामान अनुभवायला मिळेल.

5/5
बदलापूरमध्ये मंगळावरपेक्षा आज अधिक थंडी जाणवेल. हवामान निरभ्र राहील. सकाळी उशिरापर्यंत धुके असल्याने किमान तापमान 12 अंश सेल्सिअस तर कमाल 30 अंश सेल्सिअस असेल. शहापूर, मुरबाडमध्ये हवामान स्वच्छ आणि कोरडे राहील. किमान तापमान 21अंश तर कमाल 30 अंश सेल्सिअस असेल.

BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement