कुऱ्हाडीने वाहनांची तोडफोड केली
पुण्यात वाहने तोडफोडीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या चंदननगर पोलिस पथकावर सराईत गुन्हेगाराने पिस्तुलातून गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाघोली- आव्हाळवाडी रस्त्यावर शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. ओमकार भंडारे असं गोळीबारात जखमी झालेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीने कुऱ्हाडीने वाहनांची तोडफोड केली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण होतं. त्यानंतर आरोपी फरार झाले.
advertisement
आरोपीची थेट पोलिसांवर फायरिंग
पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर आरोपी वाघोली परिसरातील आव्हाळवाडी रस्त्यावर भंडारे फिरत असल्याची माहिती चंदननगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी फिल्डिंग लावली. शनिवारी रात्री पोलिसांनी ओमकार भंडारे याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने थेट पोलिसांवर फायरिंग सुरू केली. पोलिसांनी यावेळी स्वरक्षणार्थ गोळीबार केला. त्यात आरोपीच्या पायाला गोळी लागली आहे.
आरोपीच्या पायाला गोळी
दरम्यान, आव्हाळवाडी रस्त्यावर भंडारे याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या दिशेने आरोपीने गोळीबार केल्याची माहिती परिमंडळ 7 पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली आहे. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्यावर आरोपीच्या पायाला गोळी लागली. जखमी आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी सांगितलं आहे.
