TRENDING:

मोबाईल, कपडे अन् ती वस्तू..; पुण्यात पोलिसांनी दुचाकी चोरांना पकडलं पण चौकशीत झालं 'भलतंच कांड' उघड

Last Updated:

संशयास्पद वाटणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी दुचाकीसह ताब्यात घेतलं गेलं. पण त्यांच्या चौकशीतून जे सत्य समोर आलं, त्याने स्वतः पोलीसही थक्क झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : संशयास्पद वाटणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी दुचाकीसह ताब्यात घेतलं गेलं. पण त्यांच्या चौकशीतून जे सत्य समोर आलं, त्याने स्वतः पोलीसही थक्क झाले आहेत. केवळ दुचाकी चोरीच नव्हे, तर दोन घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात फुरसुंगी पोलिसांना यश आलं आहे.
अल्पवयीनं मुलांकडून चोरी (AI Image)
अल्पवयीनं मुलांकडून चोरी (AI Image)
advertisement

नेमकी घटना काय?

हांडेवाडी रोडवरील श्री साई पार्क सोसायटीमधून अमोल कुंभार यांची दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी तपास करत असताना, फुरसुंगी पोलिसांना बातमी मिळाली की रेल्वे ब्रिजखालील पॉवर हाऊस परिसरात दोन मुले संशयास्पद रित्या एका काळ्या रंगाच्या 'होंडा शाईन' दुचाकीसह थांबली आहेत. पोलिसांनी सापळा रचून या अल्पवीयन मुलांना ताब्यात घेतलं.

advertisement

Shocking Incident : काही वर्षे सुखात गेली, पण 'त्या' एका वळणाने सर्व संपवलं; ठाण्यातील विवाहितेसोबत असं काय घडलं?

चौकशीत फुटला घडा

सुरुवातीला केवळ दुचाकी चोरीचा गुन्हा वाटत होता, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच मुलांनी आपलं 'कांड' कबूल केलं. त्यांनी केवळ दुचाकीच चोरली नव्हती, तर परिसरातील दोन ठिकाणी घरफोडी देखील केली होती. त्यांच्याकडून २ मोटारसायकल, १ मोबाईल हॅन्डसेट, कपडे आणि रोख रक्कम असा सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
छंदातून उद्योगाची भरारी, उभारला बैलगाड्यांचा व्यवसाय, वर्षाला 25 लाख उलाढाल
सर्व पहा

पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील महेश नलावडे, सतीश काळे, सुनील कांबळे, वैभव भोसले व तुकाराम गुरव यांनी ही धडाकेबाज कामगिरी केली आहे.

मराठी बातम्या/पुणे/
मोबाईल, कपडे अन् ती वस्तू..; पुण्यात पोलिसांनी दुचाकी चोरांना पकडलं पण चौकशीत झालं 'भलतंच कांड' उघड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल