...म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात आलो - बापू नायर
पुण्याच्या प्रभाग 39 मधून घड्याळाच्या चिन्हावर बापू नायर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. समाजासाठी मी काही करू शकतो का? हे पाहण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात आलोय, असं म्हणच बापू नायरने निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला आहे.
मला खरात गटाकडून संधी मिळाली
advertisement
माझा बराच काळा इतिहास आहे, त्यासाठी मी काहीतरी चांगलं करता आलं तर मी त्यासाठी आलोय. मला राष्ट्रवादीचे मित्रपक्ष असलेल्या खरात गटाकडून ही संधी मिळाली. याआधी देखील जे होते, त्यांची पद्धत वेगळी होती. पण माझी पद्घत वेगळी राहिल. प्रत्येक कामात पारदर्शी काम करावं लागेल, असं बापू नायर याने म्हटलं आहे.
पोरांना गुन्हेगारीकडे जाण्याआधी रोखायचंय
माझ्या विभागात काही बारकी पोरं आहे. जी गुन्हेगारीकडं वळतायेत. त्यांना काहीजण प्रवृत्त करतात, त्यांना थांबवण्याचा माझा प्रयत्न असेल. पोरांना योग्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. माझी आई बचत गटाचं काम करते. बचत गटांना प्रोत्साहन द्याची इच्छा आहे, असंही बापू नायकने म्हटलं.
माझी इमेज चुकीची झाली
दरम्यान, मी माझ्या पद्धतीने जे काही करता येईल, याची काळजी घेऊ. सध्या आपल्याकडे नगरसेवकांची रिंग पद्धत आहे. मला राष्ट्रवादीकडून नाही तर खरात गटाकडून उमेदवारी मिळाली आहे. दादांच्या आशीर्वादाने सर्वकाही होईल. पण माझी इमेज चुकीची झाली आहे. मला ती ओळख पुसायची आहे आणि नवी ओळख निर्माण करायची आहे, असं बापू नायरने सांगितलं.
कुख्यात गुंड बापू नायर कोण?
केरळमधील वायनाड जिल्ह्यातील एका छोट्या गावातून उदरनिर्वाहासाठी पुण्यात आलेल्या नायर कुटुंबाचा बापू प्रभाकर नायर हा मुलगा. त्याचे वडील पुण्यात स्थायिक झाले आणि बापूने बिबवेवाडी परिसरात आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीच्या काळात तो अत्यंत सामान्य आयुष्य जगत होता. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने काही काळ चारचाकी चालकाचे कामही केले. मात्र, 2001 मध्ये एका मित्रासाठी घेतलेल्या धावपळीत त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आणि बापू नायरच्या आयुष्याची दिशा बदलली.
