पुणे : देशभरात नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. ठिकठिकाणी गराब आणि रास दांडियाचं आयोजन केलं आहे. तरुण आणि तरुणी गरबा खेळण्यात दंग आहे. पण पुण्यात मात्र गरब्याच्या कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडल्यामुळे भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी कमालीच्या संतापल्या.' आवाजाची मर्यादा आणि धार्मिकतेची बंधन ओलांडली आहे. त्यामुळे या पुढे या मैदानात असे कार्यक्रमात होऊ देणार नाही', असं म्हणत गरब्याचा कार्यक्रम बंद पाडला.
advertisement
पुण्यात ठिकठिकाणी नवरात्री निमित्ताने गरबा आणि दांडियाचं आयोजन केलं आहे. कोथरूडमध्ये गरब्याचं आयोजन केलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुणांनी प्रचंड गर्दी केली. शुक्रवारी रात्री कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडल्याचं समोर आलं. खुद्द भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांची तक्रार पोलिसांकडे केली होती. पण, तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार घडला. त्यानंतर कार्यक्रमाच्या स्टेजवर जाऊन मेधा कुलकर्णी यांनी कार्यक्रम बंद पाडला.
काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी?
'दरवर्षी या ठिकाणी धिंगाणा होत असल्यामुळे खूप त्रास होतो. आता अनेक मला फोन आले, मी इतर ठिकाणी आरती करायला गेले होते. मला काही व्हिडीओ पाठवले आहे, लिव्हर, कॅन्सर झालेले पेशन्ट आहे. एक अतिशय ९० वर्षांची महिला आहे. कसं सगळ्यांनी सहन करायचं. दरवर्षी इथं दहीहंडी होते. तरी सुद्धा आजी असेल आजोबा असतील, लहान मुलं असतील. हा कार्यक्रम इथून पुढे जीत ग्राऊंडवर होणार नाही' असं मेधा कुलकर्णी यांनी ठणकावून सांगितलं.
तसंच, 'इथून पुढे जीत ग्राऊंडवर होणार नाही. इथं आजूबाजूच्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा कार्यक्रम इथं आवाजाची मर्यादा ओलांडून, धार्मिकतेची सर्व बंधनं तोडून कार्यक्रम आयोजित केला. ही आवाजाची मर्यादा ओलांडली जात आहे. आम्ही रोज शास्त्री नगर पोलीस स्टेशनला फोन करतोय, डीवायसपींना फोन करतोय. सीपी अमितेश कुमार यांना मेसेज केले. पण तरीही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे नाईलाजाने सनदशील मार्गाने हा सत्याग्रह केला. यापुढे इथं कोणताही असा कार्यक्रम होऊ देणार नाही' असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.