TRENDING:

Pune : मित्रांसोबत फिरायला गेला पण कात्रजचा 21 वर्षांचा आयुष परतलाच नाही, मुळशीच्या लोटस पॉईंटवर 9 तासांचा थरारक रेस्क्यू!

Last Updated:

Pune Crime News : मृत तरुणाचे नाव आयुष हरिणखेडे असून त्याचे वय 21 वर्षे होते. तो मूळचा गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी होता आणि सध्या पुण्याच्या कात्रज भागात वास्तव्यास होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune Mulshi Ekole village incident : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एकोले गावाजवळील लोटस पॉईंट परिसरात एक अतिशय भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या निसर्गरम्य ठिकाणी एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलेला हा तरुण एका क्षणात मृत्यूच्या दाढेत ओढला गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
News18
News18
advertisement

आयुष 5 मित्रांसह फिरण्यासाठी गेला अन्...

मृत तरुणाचे नाव आयुष हरिणखेडे असून त्याचे वय 21 वर्षे होते. तो मूळचा गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी होता आणि सध्या पुण्याच्या कात्रज भागात वास्तव्यास होता. आयुष आपल्या 5 मित्रांसह फिरण्यासाठी मुळशीतील या भागात आला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसतानाही पाण्यात उतरल्यामुळे ही मोठी दुर्घटना घडली असून आयुषचा तेथेच अंत झाला.

advertisement

सायंकाळी 5:30 वाजता मृतदेह बाहेर काढला

घटनेची माहिती मिळताच पौड पोलिसांनी तातडीने हालचाली करत लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीम, वन्यजीव रक्षक मावळ आणि मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण केले. दुपारी 12:30 च्या सुमारास ही माहिती पोलिसांना मिळाली होती. पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य हाती घेतले. तब्बल दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर सायंकाळी 5:30 वाजता आयुषचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.

advertisement

रेस्क्यू टीमची मोठी दमछाक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, तुरीच्या दरात झाली मोठी वाढ, सोयाबीनला काय मिळाला दर?
सर्व पहा

मृतदेह शोधणे जितके कठीण होते, त्यापेक्षा जास्त आव्हान तो बाहेर सुरक्षितरीत्या आणण्याचे होते. येथील रस्ता अत्यंत नागमोडी, अवघड आणि पावसाळी वातावरणामुळे घसरडा झाला होता. या प्रतिकूल परिस्थितीत रेस्क्यू टीमची मोठी दमछाक झाली. अखेर सर्व अडथळे पार करून रात्री नऊ वाजता मृतदेह पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या थरारक मोहिमेत सर्व पथकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडले.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune : मित्रांसोबत फिरायला गेला पण कात्रजचा 21 वर्षांचा आयुष परतलाच नाही, मुळशीच्या लोटस पॉईंटवर 9 तासांचा थरारक रेस्क्यू!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल