TRENDING:

पुण्यातील वाहतुककोंडी संपवणाऱ्या रिंगरोडचं काय होणार? पीएमआरडीए आणि महापालिकेत निधीवरून 'जुंपली', शेवटी हा निर्णय

Last Updated:

मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरणाला खर्च करण्याचे आदेश दिले, तरच या प्रकल्पाला पुन्हा गती मिळू शकते. अन्यथा, पुण्यातील अंतर्गत वाहतुकीचा ताण कमी करणारा हा प्रकल्प कागदावरच राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी अंतर्गत रिंगरोड प्रकल्पाचे काम निधीअभावी ठप्प झाले आहे. समाविष्ट २३ गावांच्या प्रशासकीय अधिकारांवरून महापालिका आणि पीएमआरडीए यांच्यात पेच निर्माण झाला आहेय भूसंपादनासाठी लागणारा कोट्यवधींचा निधी नेमका कोणी द्यायचा, यावरून दोघांनीही हात वर केले आहेत.
पुण्यातील वाहतुककोंडी संपवणाऱ्या रिंगरोडचं काय होणार?
पुण्यातील वाहतुककोंडी संपवणाऱ्या रिंगरोडचं काय होणार?
advertisement

नेमका वाद काय?

राज्य शासनाने अलीकडेच २३ गावांमधील बांधकामासह सर्व प्रशासकीय अधिकार पुणे महापालिकेकडे (PMC) वर्ग केले आहेत. यामुळे पीएमआरडीएची भूमिका अशी आहे की, "जर या गावांचे अधिकार महापालिकेकडे गेले आहेत, तर रिंगरोडच्या भूसंपादनाचा खर्चही त्यांनीच करावा." दुसरीकडे, हा प्रकल्प मुळात प्राधिकरणाने आखलेला असल्याने महापालिका हा खर्च उचलण्यास तयार नाही. या वादात वडाची वाडी, पिसोळी, येवलेवाडी, आंबेगाव खुर्द यांसारख्या गावांमधून जाणाऱ्या रस्त्याचे काम रखडले आहे.

advertisement

भूसंपादन प्रक्रियेला 'ब्रेक'

८३ किलोमीटर लांबीच्या आणि ६५ मीटर रुंदीच्या या रिंगरोडसाठी १३ गावांतील सुमारे ११५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे ११ गावांधील जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. जमिनींचे मूल्यांकन (Valuation) देखील निश्चित करण्यात आले आहे. केवळ निधी उपलब्ध झाला असता, तर थेट खरेदी पद्धतीने जमिनी ताब्यात घेता आल्या असत्या. मात्र, दोन्ही संस्थांमधील या ओढाताणीमुळे भूसंपादनाची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे.

advertisement

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भक्ताला हनुमानाने दिला तो आशिर्वाद अन् 400 वर्षांपूर्वी स्थापन झालं 'सुपारी मंदिर', आख्यायिका माहितीये का?
सर्व पहा

या प्रकल्पाचा तिढा सोडवण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच एक उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरणाला खर्च करण्याचे आदेश दिले, तरच या प्रकल्पाला पुन्हा गती मिळू शकते. अन्यथा, पुण्यातील अंतर्गत वाहतुकीचा ताण कमी करणारा हा प्रकल्प कागदावरच राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील वाहतुककोंडी संपवणाऱ्या रिंगरोडचं काय होणार? पीएमआरडीए आणि महापालिकेत निधीवरून 'जुंपली', शेवटी हा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल