मी अजितदादांना मागणी करतीये की...
मी देखील निवडणूक लढणार आहे. मी तसा अर्ज भरला होता शिवसेनेचा पण अजून तिकीट मिळणार की नाही, याची माहिती नाही. पण मला वाटतं की मी अन्यायाविरुद्ध लढतीये. मी अन्याय आता सहन करू शकत नाही. मी अजितदादांना मागणी करतीये की, यांना उमदेवारी देऊ नका. अजितदादा म्हणतात की, कोयता गँग थांबायला पाहिजे, गँगवॉर थांबायला पाहिजे अन् त्यांना तिकीट देतात, असंही कल्याणी कोमकर यांनी म्हटलं आहे.
advertisement
बंडू आंदेकरच्या डोक्यावर कोणत्या पक्षाचा हात?
बंडू आंदेकरचे पैसे सील केले. पण अर्ज भरायला यांच्याकडे पैसे कुठून आले. बंडू आंदेकरच्या डोक्यावर कोणत्या पक्षाचा हात आहे? असा सवाल देखील कल्याणीने विचारला. अजित पवार यांना मदत करतात, असं मी म्हणू शकते. त्यांची पॉवर आता ऐवढी वाढलीये, त्यामुळे त्यांच्यावर कुठल्या तरी मोठ्या लोकांचा हात आहे. जर अजितदादांना त्यांना तिकीट दिलं तर मी त्यांच्या पक्षाबाहेर आत्मदहन करेन, असंही कल्याणी म्हणाली.
अजितदादांची भेट घेणं सोपं नाही म्हणून....
माझ्या मुलाचं आयुष्य उद्धवस्त केलं. मी त्यांना सोडणार नाही. मी न्याय मागणार. आम्हाला एक संधी द्यावी, एका आईच्या पाठीशी उभं रहावं असं मला वाटतं. अजितदादांची भेट घेणं सोपं नाही म्हणून त्यांना भेटणं झालं नाही. मी फॉर्म भरणार आहे की नाही, याबाबत मला खात्री नाही. आम्ही आमच्या भावाची सुपारी का देऊ? यातून आम्हाला काय फायदा होणार? असा सवाल वनराजच्या मर्डरवर कल्याणीने केलाय.
बंडूला अपक्ष लढू द्या पण...
दरम्यान, माझ्या मुलाची कोणाशी भांडणं नव्हती. बंडूला अपक्ष लढू द्या पण सत्तेच्या पक्षाने त्यांना तिकीट द्यायला नको. गणेश काळेचा देखील खून केला. लोकांची घरं उद्धवस्त झालं. अर्ज भरायला आले तर गपचूप अर्ज भरायला पाहिजे होता. विजय निंबाळकर, निखील आखाडे, गणेश काळे आणि आयुष कोमकर यांची हत्या बंडू आंदेकरने केलीये, असा आरोप देखील कल्याणी कोमकरने केला आहे.
