कल्याणीनगरमधील एका संकुलात मसाज सेंटरच्या आड अनैतिक प्रकार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तिथे छापा टाकला. यावेळी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून मोतीबर समसुलहक रेहमान (वय ३१, रा. विमाननगर) आणि अब्दुल मोनुउद्दीन आवाल (वय १९, रा. येरवडा) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
advertisement
याप्रकरणी पोलीस अंमलदार बालाजी सोगे यांनी फिर्याद दिली असून, आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत (PITA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान आणि गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पुणे पोलिसांचा 'क्लीन अप' ड्राईव्ह: शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार गेल्या काही दिवसांत कोंढवा, बाणेर आणि कात्रज-मंतरवाडी भागातही अशाच प्रकारचे छापे टाकून अनेक रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. अवैध धंदे चालवणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
