बिजली या फुलाच्या वाणाची ऑक्टोबर पासून ते जानेवारीपर्यंत लागवड करता येते. याबरोबरच शेवंती या वाणाची मार्चमध्ये लागवड करता येते. वेगवेगळ्या वीस गुंठ्यामध्ये दोन ठिकाणी एकूण एक एकर मध्ये बिजलीची लागवड केलेली आहे. यामध्ये 3500 बिजली रोपांची 4.5 बाय 2 वर ही लागवड आहे. ड्रीप द्वारे पाण्याचं व्यवस्थापन या ठिकाणी करण्यात आलं आहे. गेल्या एक महिनाभरापासून या शेतीतून उत्पादन सुरू झालेलं आहे. या कालावधीत 10 क्विंटल पर्यंत उत्पादन निघालं आहे. आणखी दीड महिन्यापर्यंत यातून उत्पन्न मिळेल.
advertisement
एक एकर बिजली शेतीमध्ये 30 ते 40 क्विंटल उत्पादन निघायला हवे, सध्यातरी या फुलांना 50 रुपये किलो पर्यंत बाजारात भाव आहे. याचप्रमाणे बिजली फुलांचा बाजार भाव स्थिर राहिल्यास खर्च वजा करून 1 ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळेल. बिजली फुलांची शेती सोप्या पद्धतीची आहे, तसेच या शेतीला जास्त खर्च देखील लागत नाही. तसं जर पाहिलं तर या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव देखील कमी असतो. त्यामुळे ही शेती फायदेशीर आहे, तरुण व इतर शेतकऱ्यांना देखील या शेतीत येण्यास काहीच हरकत नाही असे देखील आटोळे यांनी म्हटले आहे.





