नेमकी घटना काय?
खराडी येथील झेन्सार आयटी पार्क परिसरात इराणी चहासाठी प्रसिद्ध असलेले एक हॉटेल आहे. मंगळवारी रात्री ३० डिसेंबर रोजी आतिष बाळासाहेब भगत (३२, रा. खराडी) हा तरुण मद्यधुंद अवस्थेत या हॉटेलमध्ये शिरला. "हॉटेल एवढ्या उशिरापर्यंत का सुरू ठेवले?" असा वाद त्याने तिथे काम करणाऱ्या नीरज गौतम या कामगाराशी घातला.
advertisement
हा वाद इतका विकोपाला गेला की, भगतने हॉटेल बंद करण्याची सक्ती करत तिथे तोडफोड सुरू केली. त्याने कामगाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या कामगाराने तातडीने हॉटेल मालक नीलेश गुरव यांच्याशी संपर्क साधून घटनेची कल्पना दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील झेन्सार आयटी पार्क परिसरातील हे हाॅटेल इराणी चहासाठी प्रसिद्ध आहे. मंगळवारी (दि. ३०) रात्री दहाच्या सुमारास भगत हाॅटेलमध्ये आला. हाॅटेल उशिरापर्यंत का सुरू ठेवले, अशी विचारणा करून त्याने कामगार नीलेश गौतम याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. मद्यधुंद तरुणाने हाॅटेलमधील साहित्याची तोडफोड करून शिवीगाळ केली. घाबरलेल्या नीरजने या घटनेची माहिती गुरव यांना दिली. पोलिसांनाही कळवण्यात आले. त्यानंतर भगत याला ताब्यात घेण्यात आले. ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. भगत याला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक सावन आवारे पुढील तपास करत आहेत.
