खरं तर खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पडत असलेल्या पावसाने चाकसमान धरणामधून भीमा नदीपात्रात सुमारे 30500 क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या चास टोकेवाडी दरम्यान भीमा नदीवर असणाऱ्या पुलावर देखील पावसाचे पाणी साचले आहे. या पाण्यातून एका कार चालकाने गाडी घालण्याच धाडस केलं होतं.हे धाडस आता कार चालकाच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.
advertisement
कारण कार चालकाने पुलावर गाडी घालताच थोड्या दूर गेल्यानंतर अचानक पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याची घटना घडली आहे.विशेष म्हणजे ही कार नुसती वाहून गेली नाही तर नदीपात्रात बुडाली देखील आहे. या कारमध्ये तीन माणसं असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
दरम्यान पुराच्या पाण्यात गाडी घातल्याचे प्रकार याआधी देखील घडले आहेत. या घटना देखील वाहन चालकांच्या जीवावर बेतल्या आहेत.त्यामुळे वाहत्या प्रवाहीत पाण्यात गाडी चालवणे की रस्ता ओलांडणे टाळले पाहिजे नाहीतर जीवावर बेतण्याची शक्यता आहे.