मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२३ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून पीडित महिलेची ओळख वसईतील ऋषिकेश वैद्यशी झाली होती. पीडित महिला धार्मिक प्रवृत्तीची असल्याने ऋषिकेशने तिला 'ईश्वराची उपासना कशी करायची' याचे तंत्र शिकवण्याचे आमिष दाखवले. २०२३ मध्ये तो पुण्यात आला आणि मांजरी परिसरात त्याने महिलेला गाठले. तिथे तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही, तर त्यानंतर त्याने महिलेला वसईला बोलावून तिथेही वारंवार अत्याचार केले.
advertisement
पोलीस पथके रवाना
नाशिकच्या खरात प्रकरणाची बातमी वाचल्यानंतर पीडित महिलेने हिंमत एकवटली आणि पोलिसांकडे धाव घेतली. सध्या आरोपी ऋषिकेश वैद्य पसार असून, पुणे आणि वसई पोलिसांची पथके त्याच्या मागावर आहेत. या भोंदूने अशाच प्रकारे आणखी काही महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी आवाहन केले आहे की, "जर अशा प्रकारे कुणाची फसवणूक किंवा अत्याचार झाला असेल, तर त्यांनी न घाबरता पुणे पोलिसांकडे तक्रार द्यावी."
