पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने 2024 साली विवाह संकेतस्थळावर नाव नोंदवले होते. त्यानंतर एका व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधून लग्नाची इच्छा व्यक्त केली. गोड बोलून प्रेमाचे आश्वासन देत त्याने तिचा विश्वास संपादन केला. यानंतर विविध कारणे सांगत पैशांची मागणी करण्यात आली. कोणतीही खातरजमा न करता महिलेने गेल्या दीड वर्षात वेळोवेळी त्याच्या खात्यात रक्कम जमा केली. या प्रकारात एकूण 59 लाख 37 हजार रुपये त्या व्यक्तीच्या खात्यावर जमा करण्यात आले होते.
advertisement
पुणेकरांनो आता घरातही सावधच बसा! भरधाव डंपर काळ बनून घरात घुसला, महिलेचा जागीच मृत्यू
काही कालावधीनंतर महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता संबंधित व्यक्तीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. महिलेने आग्रह धरल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. मोठी रक्कम मिळाल्यानंतर त्या भामट्याने आपला मोबाइल नंबर बंद केला आणि तिच्याशी सर्व संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, विवाहाच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी करताना महिलांनी संकेतस्थळाची विश्वसनीयता तपासणे अत्यंत गरजेचे आहे. अनोळखी व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवल्यास त्वरित खातरजमा करून, सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






