TRENDING:

Pune Metro News : अरे वा! पुण्यातील मेट्रो आता चालणार विनाचालक; पहिली सेवा सुरु होणार 'या' मार्गावर

Last Updated:

Pune Metro Driverless Train Service Launch : पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील मेट्रो आता ड्रायव्हरशिवाय चालणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे मेट्रो आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात ड्रायव्हरलेस सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही सेवा सुरुवातीला खडकवसला ते खराडी या मुख्य मार्गावर सुरू होणार आहे. पुणे शहरातील वाढती प्रवासी मागणी लक्षात घेता या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी चुका कमी होतील तसेच वेळेवर सेवा देण्याची क्षमता वाढेल असे मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
News18
News18
advertisement

सध्याच्या प्रकल्प अहवालानुसार मेट्रो लाईन-४ मध्ये ATO (Attended Train Operation) मोड लागू करण्यात येईल, ज्यामध्ये ट्रेनमध्ये एक चालक असेल जो सिग्नलिंग, ऑपरेशन्स आणि सुरक्षिततेवर लक्ष ठेवेल. मात्र, वाढती प्रवासी संख्या आणि वाहतुकीच्या गरजा लक्षात घेता पुणे मेट्रो आता UTO (Unattended Train Operation) मोडवर जाण्याचा विचार करत आहे. UTO मोडमध्ये ट्रेन ऑपरेशन्स पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने पार पडतील ज्यासाठी चालकाची आवश्यकता राहणार नाही.

advertisement

दुसऱ्या टप्प्यातील लाईन-४ ची लांबी 31.6 किलोमीटर असून 28 स्थानके असतील. या मार्गावर खडकवासला ते खराडी हा मुख्य मार्ग असेल. ड्रायव्हरलेस ऑपरेशन्ससाठी 75 कोचेस खरेदी करण्याची योजना आहे. या ट्रेनसाठी UTO आधारित सिग्नलिंग प्रणाली, सार्वजनिक घोषणा प्रणाली, प्रवासी माहिती प्रदर्शन प्रणाली, मास्टर क्लॉक, व्हॉइस रेकॉर्डिंग, टेलिफोन प्रणाली, सायबर सुरक्षा,सीसीटीव्ही आणि फायबर ऑप्टिक ट्रान्समिशन सारखी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.

advertisement

स्वयंचलित प्रणालीमुळे ट्रेन सुरू करणे, दारे उघडणे आणि बंद करणे, स्थानकांवर थांबणे अशा सर्व ऑपरेशन्स स्वयंचलित पद्धतीने पार पडतील. सध्याच्या फेज 1 मार्गांवर देखील ऑटोमेशन आणले जाईल. परंतु, तिथे चालक निरीक्षणासाठी उपस्थित राहतील. एकदा प्रणाली अपग्रेड झाल्यावर फेज एकचे मार्गही नंतर ड्रायव्हरलेस केले जातील.

फेज दोनच्या मार्गावर खडकवासला ते हडपसर मार्गे खराडी असा मुख्य मार्ग असून यामध्ये नळस्टॉप ते माणिकबाग हा एक उपमार्ग असेल ज्यामध्ये सहा स्थानके असतील. ही मेट्रो वारजे, हडपसर, मगरपट्टा आणि मध्यवर्ती स्वारगेट भागातूनही जाईल. या सेवा केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

advertisement

ड्रायव्हरलेस मेट्रो संकल्पना फक्त पुण्यातच नव्हे तर मुंबई, दिल्लीसह इतर महानगरांमध्ये देखील राबविण्यात येणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि वेळेवर सेवा मिळेल तसेच मानवी चुका कमी होतील. मेट्रो प्रकल्प अधिकाधिक सोयीस्कर आणि प्रवासी-अनुकूल होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

फेज दोन मधील ड्रायव्हरलेस सेवा सुरू झाल्यानंतर पुणेकरांना प्रवासाचा अनुभव अधिक सुरळीत आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मिळेल. यात ट्रान्सशिपमेंट, टाइमिंग आणि सुरक्षितता या सर्व बाबींचा समावेश असेल ज्यामुळे पुणे मेट्रो शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाची ठरेल.

advertisement

या संकल्पनेअंतर्गत फेज एकचे मार्गही हळूहळू ड्रायव्हरलेस बनवले जातील.परंतु, सुरुवातीला चालक निरीक्षणासाठी उपस्थित राहतील. सल्लागारांची नियुक्ती करून प्रणालीचे सखोल परीक्षण केले जाईल. पुणे मेट्रोचा हा आधुनिक पाऊल शहरातील वाहतुकीला अधिक सुरक्षित, वेगवान आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर बनवेल, असा प्रकल्पातील अधिकाऱ्यांचा विश्वास आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro News : अरे वा! पुण्यातील मेट्रो आता चालणार विनाचालक; पहिली सेवा सुरु होणार 'या' मार्गावर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल