TRENDING:

पुणे मेट्रोच्या बोगद्याला पाडलं भगदाड! 'बोरवेल' घेताना थेट मेट्रो ट्रॅकवर आलं पाणी, कक्षात दिसला 'वॉटर अलर्ट'अन् मोठी धावपळ

Last Updated:

मेट्रोच्या नियंत्रण कक्षात अचानक 'वॉटर अलर्ट' दिसू लागल्याने अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. ऑपरेटरच्या ही बाब निदर्शनास येताच मेट्रोच्या तांत्रिक पथकाने तातडीने संपूर्ण बोगद्याची पाहणी केली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाला एका खाजगी बोरवेलमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवार पेठ परिसरात एका इमारतीचे बोरवेल खोदत असताना, ते थेट मेट्रोच्या बोगद्यात घुसले. यामुळे सिमेंटच्या रिंगला तब्बल ६ इंचाचे भगदाड पडले. परिणामी बोगद्यात पाण्याची मोठी गळती सुरू होऊन यंत्रणेत 'वॉटर अलर्ट' जारी झाला होता.
थेट मेट्रो ट्रॅकवर आलं पाणी,
थेट मेट्रो ट्रॅकवर आलं पाणी,
advertisement

यंत्रणेने दिला 'वॉटर अलर्ट'

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १४ मार्च रोजी घडली. मेट्रोच्या नियंत्रण कक्षात अचानक 'वॉटर अलर्ट' दिसू लागल्याने अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. ऑपरेटरच्या ही बाब निदर्शनास येताच मेट्रोच्या तांत्रिक पथकाने तातडीने संपूर्ण बोगद्याची पाहणी केली. तेव्हा शुक्रवार पेठ येथील एका खाजगी जागेत बेकायदेशीरपणे बोरवेलचे काम सुरू असल्याचे दिसून आले. तसेच त्याचे टोक थेट खाली असलेल्या मेट्रो बोगद्याच्या सिमेंट रिंगला छेदून आत आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

advertisement

बोगद्याला भगदाड पडल्याने पाणी झिरपण्यास सुरुवात झाली होती. ज्यामुळे मेट्रोच्या विजेच्या तारा आणि रुळांना धोका निर्माण होऊ शकला असता. मात्र, मेट्रो प्रशासनाने युद्धपातळीवर काम करत हे ६ इंचाचे छिद्र विशेष केमिकल आणि काँक्रीटचा वापर करून पूर्णपणे बुजवले आहे. या गंभीर निष्काळजीपणाबद्दल आणि मेट्रो मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधित जागा मालक आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अजबच! महाराष्ट्रात इथं आहे ‘नवरा-नवरी’चं मंदिर, नवसासाठी होते गर्दी, पण 'ते' गूढ आजही कायम, Video
सर्व पहा

पुणे मेट्रोचा हा मार्ग जमिनीखाली बराच खोल असल्याने वरच्या भागात खोदकाम करताना मेट्रो प्रशासनाची परवानगी घेणे अनिवार्य आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करून केलेल्या या कामामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

मराठी बातम्या/पुणे/
पुणे मेट्रोच्या बोगद्याला पाडलं भगदाड! 'बोरवेल' घेताना थेट मेट्रो ट्रॅकवर आलं पाणी, कक्षात दिसला 'वॉटर अलर्ट'अन् मोठी धावपळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल