मदत करण्याच्या बहाण्याने घातला गंडा: मिळालेल्या माहितीनुसार, चिंबळीगाव येथील एक १७ वर्षीय मुलगा बुधवारी रात्री मोशी टोलनाक्याजवळील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. तांत्रिक कारणास्तव त्याचे एटीएम कार्ड मशिनमध्ये अडकले. मुलगा गोंधळलेला असतानाच मागे उभ्या असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने आपण बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवले. "जवळच्या एटीएममधील सुरक्षा रक्षक हे कार्ड काढून देतील," असे सांगून त्याने मुलाची दिशाभूल केली.
advertisement
भामट्याने मोठ्या चालाखीने मुलाला मशिनवर पिन नंबर टाकण्यास भाग पाडले. मुलाचा पिन नंबर पाहिल्यानंतर, त्याने हातचलाखी करून मुलाच्या आईच्या बँक खात्यातील सर्व पैसे परस्पर काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलाने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
अल्पवयीन मुलाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता या 'बनावट बँक कर्मचाऱ्याचा' शोध घेत आहेत. एटीएममध्ये अनोळखी व्यक्तींना आपला पिन नंबर सांगू नका किंवा त्यांच्या देखत तो टाकू नका, असे आवाहन पोलिसांनी यानिमित्ताने केले आहे.
