TRENDING:

अंगारकी चतुर्थी! राजूर महागणपती मंदिराला अडीच लाख दिव्यांची रोषणाई, भाविकांची मांदियाळी, Video

Last Updated:

Bappa Morya: राजुरेश्वराच्या दर्शनासाठी मराठवाडा, विदर्भाबरोबर संपूर्ण राज्यातून भाविक येतात. नवसाला पावणारा गणपती अशी भाविकांची श्रद्धा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: यंदा नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारकी चतुर्थी आली आहे. त्यामुळे जालन्यातील प्रसिद्ध राजूर महागणपती मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. राजूर गणपती संस्थान दरवर्षी वेगवेगळ्या थीम अंतर्गत काहीतरी वेगळं करत असते. यंदा तब्बल दोन लाख 50 हजार विद्युत दिव्यांची रोषणाई मंदिराला करण्यात आली असून यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला आहे.
advertisement

नववर्षाच्या सुरुवातीलाच अंगारकी चतुर्थी आल्याने लाखो भाविक बाप्पाच्या दर्शनाला येणार आहेत. त्यादृष्टीने मंदिर समिती प्रशासनाने चोख बंदोबस्त केला आहे. ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आली असून पोलीस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली आहे.

सायंकाळी पाच वाजल्यापासूनच जालना, भोकरदन, सिल्लोड, टेंभुर्णी, जाफराबाद यांसारख्या आसपासच्या परिसरातून लोक राजूरकडे निघताना पाहायला मिळाले. वाटेमध्ये त्यांच्यासाठी पाण्याची, चहाची आणि विविध प्रकारच्या फराळाची व्यवस्था देखील करण्यात आली होती.

advertisement

Aajache Rashibhavishya: मेष ते मीन राशींवर बाप्पाची कृपा, मंगळवारी टाळा ‘या’ चुका, आजचं राशीभविष्य

यंदा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच अंगारकी चतुर्थी असल्याने या चतुर्थीची तयारी आम्ही मागील महिनाभरापासून करत होतो. यावेळी साधारणपणे आठ ते दहा लाख भाविक येतील या अपेक्षेने आम्ही आमची तयारी केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

advertisement

राजुरेश्वराच्या दर्शनासाठी मराठवाडा, विदर्भाबरोबर संपूर्ण राज्यातून भाविक येतात. नवसाला पावणारा गणपती असल्याने भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी मंदिर परिसराला तब्बल अडीच लाख विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आल्याची माहिती विश्वस्त प्रशांत दानवे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

जालना ते राजूर पायी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कौटुंबिक जबाबदारी असताना घेतला निर्णय,उभारला मशरूमचा प्लांट, 5 लाखांची कमाई
सर्व पहा

आम्ही परभणी येथून राजुरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. परभणीहून जालन्याला ट्रेनने आलो तर जालनावरून राजूर हे 30 किमी अंतर आम्ही पायी चालत जाणार आहोत. आमच्याबरोबर पायी चालणारे लाखो भाविक आहेत. गणरायावर असलेल्या श्रद्धेमुळे आम्ही मागील अनेक वर्षांपासून जालना ते राजूर पायी जात असतो, असं परभणीतील एका भाविकांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
अंगारकी चतुर्थी! राजूर महागणपती मंदिराला अडीच लाख दिव्यांची रोषणाई, भाविकांची मांदियाळी, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल