TRENDING:

आयटीयन्ससाठी गूड न्यूज! पुणे-मुंबई प्रवासात एक तास वाचणार, त्या मागणीला अखेर यश

Last Updated:

पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. पुणे शहरातील प्रचंड वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी आता हिंजवडी येथून थेट मुंबईसाठी एसटी बससेवा सुरू होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा किमान एक तास वेळ वाचणार असून, प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होणार आहे.
आयटीयन्ससाठी गूड न्यूज (फाईल फोटो)
आयटीयन्ससाठी गूड न्यूज (फाईल फोटो)
advertisement

वाहतूक कोंडीचा अडथळा दूर होणार

सध्या स्वारगेट, पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या शिवनेरी आणि शिवाई बसला वाकड चौकातून शहरात शिरताना आणि बाहेर पडताना दीड ते दोन तासांचा विलंब होतो. हिंजवडीतून थेट बस सुरू झाल्यामुळे प्रवाशांना आता स्वारगेटला जाण्याची गरज उरणार नाही. पर्यायाने, शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडीचा फटका न बसता बस थेट हायवेला लागेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.

advertisement

प्रवाशांना मिळणारे फायदे:

पुणे शहरात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना होणारा १ ते १.५ तासांचा विलंब पूर्णपणे टळणार आहे.

मेट्रो कनेक्टिव्हिटी: आगामी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ मुळे प्रवाशांना हिंजवडीतील एसटी बस स्थानकापर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.

ई-बस सुविधेवर भर: हिंजवडीतच बससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे ई-शिवनेरी आणि ई-शिवाई बसेसची उपलब्धता वाढेल.

advertisement

थेट कनेक्टिव्हिटी: हिंजवडीतील आयटी प्रोफेशनलना घरून किंवा ऑफिसवरून थेट मुंबई गाठणे सुलभ होईल.

प्रशासनाची तयारी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोलापूर कांदा मार्केटमधून मोठं अपडेट, आवक घटली, क्विंटलला किती मिळाला भाव?
सर्व पहा

एसटी प्रशासनाने या सेवेचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवला असून, लवकरच याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. पुणे विभागाचे नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले की, प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन पुढील काही महिन्यांत ही सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. हिंजवडीतून दादर, बोरीवली आणि ठाणे या मार्गावर बस फेऱ्या सुरू होऊ शकतात.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
आयटीयन्ससाठी गूड न्यूज! पुणे-मुंबई प्रवासात एक तास वाचणार, त्या मागणीला अखेर यश
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल