काय म्हणाले वसंत मोरे?
गोर गरिबांना त्रास द्यायचा, मारामाऱ्या करायच्या... टिळेकर नगर किंवा डोंगरावरील नागरिकांना धमक्या द्यायच्या, असे प्रकार प्रभाग क्रमांक 40 मध्ये चालणार नाहीत, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. माझी आमदारांना आणि त्यांच्या चिल्यापिल्यांना विनंती आहे. अशा धमक्या द्यायच्या भानगडीत तुम्ही पडू नका. कारण आम्ही कात्रजचा घाट दाखवणारी माणसं आहोत, असं म्हणत वसंत मोरेंनी निवडणुकीत शड्डू ठोकला आहे.
advertisement
आजिबात दमदाट्या करायच्या नाहीत
आम्ही उतरलो तर पूर्ण ताकदीने उतरतो. डोंगरावरच्या एका जरी घराला धक्का लागला, एकाच्या घराची भिंत जरी पडली, घराची वीट जरी पडली तर तुमचं या भागात काय काय पडल याचा हिशोब तुम्ही करत बसाल, अशा इशारा देखील वसंत मोरे यांनी केला दिला आहे. गरिबांना आजिबात दमदाट्या करायच्या नाहीत. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक लढतोय, असंही मोरे यावेळी म्हणाले.
रुपेश मोरे निवडणुकीच्या रिंगणात
दरम्यान, पुणे महानगरपालिकेसाठी वसंत मोरे आणि त्यांचा मुलगा रुपेश मोरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून हे बाप लेक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कात्रजची मत हवीत पण विकास नको अशी टीका वसंत मोरे यांनी केली. मी ज्या पद्धतीनं काम करतो त्या पद्धतीनं मुलानं करावं अशी अपेक्षा वसंत मोरेंनी व्यक्त केली.
