नेमका काय आहे हा प्रयोग?
एनसीएलच्या शास्त्रज्ञांनी ओला कचरा, विघटन होणारा सुका कचरा, उसाचे पाचट आणि बांबू यांसारख्या टाकाऊ पदार्थांपासून 'डीएमई' गॅस बनवण्याची स्वदेशी प्रक्रिया विकसित केली आहे. विशेष म्हणजे, यासाठी वापरले जाणारे 'कॅटॅलिस्ट' (उत्प्रेरक) देखील पूर्णपणे स्वदेशी आहे. सध्या पिरंगुट येथे एका प्रायोगिक प्रकल्पात दररोज २५० किलो गॅसचे उत्पादन घेतले जात आहे.
advertisement
एनसीएलचे संचालक आशिष लेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आपल्या एकूण ऊर्जेपैकी ८० टक्क्यांहून अधिक ऊर्जा आयात करतो. जर देशातील ८ टक्के एलपीजीची जागाही'डीएमई'ने घेतली, तर दरवर्षी सुमारे ९,५०० कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होऊ शकते.
कसा वापरता येईल हा गॅस?
मिश्रण : सध्याच्या कोणत्याही उपकरणांत बदल न करता एलपीजीमध्ये ८ ते २० टक्क्यांपर्यंत 'डीएमई' मिसळून वापरता येतो.
पर्यावरणपूरक: हा वायू पूर्णपणे कचऱ्यापासून बनत असल्याने तो १०० टक्के पर्यावरणपूरक आहे.
रोजगार निर्मिती: प्रत्येक राज्यात असे प्रकल्प उभारल्यास कचरा व्यवस्थापनासोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील.
पुढील सहा ते नऊ महिन्यांत दररोज २.५ टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असून, त्यानंतर ५०० ते १००० टन क्षमतेचे व्यावसायिक प्रकल्प उभे करण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे. पुण्याच्या या संशोधनामुळे भविष्यात स्वयंपाकघरातील गॅसचा प्रश्न कायमचा सुटण्याची चिन्हे आहेत.
