नेमकी घटना काय?
संकेत बोथरा (वय ३०, रा. धनकवडी) हा तरुण शनिवारी सायंकाळी स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे उड्डाणपुलावरून आपल्या दुचाकीवरून जात होता. यावेळी अचानक त्यांच्या गळ्याला आणि हाताला नायलॉन मांजा अडकला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी संकेत यांनी हाताने मांजा काढण्याचा प्रयत्न केला.
बँक ॲप्लिकेशनचा पासवर्ड बदलताना सावधान; एक नोटिफीकेशन अन् पुण्यातील तरुणाने गमावले लाखो रूपये
advertisement
बोटाच्या नसा कापल्या: दुर्दैवाने, संकेत यांच्या हातात अडकलेला मांजा त्याचवेळी शेजारून वेगात जाणाऱ्या एका दुसऱ्या वाहनात अडकला. वाहन पुढे गेल्याने मांजाला अचानक मोठा ताण आला आणि तो संकेत यांच्या हातावर मांजा घासून बसला. हा मांजा इतका धारदार होता की, संकेत यांच्या उजव्या हाताचा अंगठा अर्ध्याहून अधिक कापला गेला असून बोटाच्या नसाही पूर्णपणे तुटल्या आहेत. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या संकेत यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शहरात नायलॉन मांजाच्या विक्रीवर कडक बंदी असतानाही छुप्या पद्धतीने याची विक्री सुरूच आहे. वारंवार होणाऱ्या या जीवघेण्या अपघातांमुळे पुणेकरांमध्ये संतापाची लाट असून, केवळ गुन्हे दाखल न करता नायलॉन मांजा विक्रेत्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
